Home » Gen Z वर्गाची सध्याची समाजातील जीवनशैली आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

Gen Z वर्गाची सध्याची समाजातील जीवनशैली आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

by Team Gajawaja
0 comment
Gen Z and Changing Lifestyle
Share

Gen Z And Changing LifeStyle :  आजची पिढी काळानुसार वेगाने बदलताना दिसतेय. त्यामध्ये  Gen Z पिढीता सध्या उदय झाला असून ती डिजिटल जगात वाढलेली पिढी आहे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, करिअर स्पर्धा आणि बदलत्या समाजरचनेमुळे त्यांचे जीवन पूर्वीपेक्षा खूप वेगळे झाले आहे. ही पिढी आत्मविश्वासू, स्वतंत्र आणि विचारशील असली तरी तिच्या मनावर असणारा ताण, चिंता आणि मानसिक अस्थिरतेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. झेन झी वर्गाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्य हा विषय आता फक्त चर्चेचा भाग राहिला नसून, तो गरज बनला आहे.

झेन झी वर्गाचे लाइफस्टाइल

पहिला मोठा बदल म्हणजे डिजिटल फ्रीडम  Gen Z ची दुनिया स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशिवाय अपूर्ण आहे. दिवसाचे अनेक तास स्क्रीनसमोर घालवणे, सतत नोटिफिकेशन्स पाहणे आणि  एकमेकांसोबत तुलना करणे या सवयी मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. यामुळे झेन झी पिढीत फोमो (Fear of Missing Out), डिजिटल थकवा आणि सतत मान मिळवण्याची हाव या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. अशातच झेन झी वर्गातील पिढीला आत्मविश्वास कमी होणे, एकटेपणा आणि चिंतेची समस्या भेडसावताना दिसते.( Gen Z And Changing LifeStyle )

Gen Z and Changing Lifestyle

Gen Z and Changing Lifestyle

दुसरे म्हणजे, जीवनशैलीतील वेगवान बदल आणि दबाव  हेदेखील तणावाचे मोठे कारण आहे. शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य आणि सोशल इमेज या सर्व गोष्टींत परिपूर्णतेचा दबाव Gen Z वर खूप आहे. त्यांना  आयुष्यात ब्रेक घेण्याची सवय नाही सतत काहीतरी साध्य करण्याची धडपड मानसिक थकवा आणि भावनिक असंतुलन निर्माण करते. काहीजण या तणावातून बाहेर पडण्यासाठी पार्टी, नेटफ्लिक्स किंवा सोशल मीडियाचा आधार घेतात, पण त्यामुळे फक्त तात्पुरता आराम मिळतो, मूळ समस्या तशीच राहते.(Gen Z And Changing LifeStyle )

मानसिक आरोग्याबद्दल जागृकता

मानसिक आरोग्याबद्दलची जागृकता झेन झी पिढीत खूप दिसते. यांच्याबद्दलची  सकारात्मक बाब म्हणजे हीच पिढी मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यास तयार आहे. थेरपी, सेल्फ-केअर किंवा माइंडफुलनेस हे शब्द आता लाजिरवाणे वाटत नाहीत. अनेक तरुण स्वतःच्या भावना ओळखतात, मदत मागतात आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वेळ काढतात. त्यांच्यामधील हाच  बदल समाजासाठी प्रेरणादायी आहे.(Gen Z And Changing LifeStyle )

======================

हे देखील वाचा :

 Learn To Trust Yourself: स्वतःवर विश्वास ठेवायला शिका या ५ सवयी करतील कमाल                                    

NATO Dating : नाटो डेटिंग म्हणजे काय आणि त्याचे संकेत कसे ओळखावे?                                    

World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?                                    

========================

स्वत:शी एकनिष्ठ राहणे ही सध्याची सर्वाधिक गरज आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणे, फोनपासून दूर राहणे, प्राणायाम करणे आणि आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी करणे, हे मानसिक संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. संवाद हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. मित्रपरिवाराशी मनमोकळं बोलल्याने मनावरील ओझं हलकं होतं. तर हे स्पष्ट आहे की Gen Z पिढी ही भावनिकदृष्ट्या जागृक पण मानसिकदृष्ट्या आव्हानांना सामोरी जाणारी पिढी आहे. तंत्रज्ञान, करिअर आणि समाज यांच्यात समतोल साधत त्यांनी स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. कारण खरी प्रगती फक्त आर्थिक किंवा डिजिटल नसून, ती मनाच्या शांततेत आणि आनंदात दडलेली आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.