Double Chin Remedies शरिराच्या कोणत्याही भागात वाढलेली चरबी पाहून बहुतांशजणांना टेन्शन येत. अशातच चेहऱ्यावरील फॅट्सबद्दल बोलायचे झाल्यास यामुळे लूक बिघडला जातो आणि वयापेक्षा अधिक दिसू लागतो. चबी चीक्स आणि डबल चीन संपूर्ण चेहऱ्याला लूक फार वेगळा दिसला जातो. शरिराच्या वेगवेगळ्या ठिकाणचे फॅट्स कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात. चेहऱ्यावरील फॅट्समागे काही कारणे असू शकतात. काहीवेळेस वॉटर रिटेंशनच्या कारणास्तवही चेहरा फुललेला दिसतो. फेस फॅट्स कमी करण्यासाठी फेशियल एक्सरसाइज, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये काही बदल करणे महत्वाचे असते. अशातच डबल चीनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया…
डबल चीनच्या समस्येसाठी काय करावे?
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी हाइड्रेट राहणे फार महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरिरावली चरब कमी होण्यास मदत होईल.
-गोड पदार्थांचे अत्याधिक सेवन करणे टाळावे. साखरेमुळे फेस फॅट्स वाढले जाऊ शकतात. यामुळे शरिरातील हार्मोन असंतुलित होऊ शकतात. स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलही वाढवतो आणि चेहऱ्याच्या आजूबाजूला फॅट्स जमा होऊ लागतात.
-डाएटमध्ये अधिकाधिक फायबरचा समावेश करावा. यावेळी कार्ब्स आणि साखरेचे सेवन कमी करावे.
-रिफाइंड कार्ब्स आणि साखर, जसे की कुकीज, पास्ता, केक, नूडल्स आणि साखरयुक्त ड्रिंक्स पिणे बंद करा.
-फेस फॅट्स कमी करण्यासाठी फेशियल एक्सरसाइज करा. यामुळे डबल चीनची समस्या कमी होईल.
-फेस फॅट्समागील मोठे कारण म्हणजे शरिरातील स्ट्रेस हार्मोन वाढणे. यामुळे दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये असल्यास या स्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा.
![Double Chin](https://gajawaja.in/wp-content/uploads/2022/06/double-chin.jpg)
Double Chin
डबल चीनच्या समस्येवर एक्सरसाइज
पाउट करा
फोटो काढताना बहुतांशवेळा पाउट करतो. पण डबल चीनची समस्या असल्यास पाउटची एक्सरसाइज करू शकता. यासाठी चेहरा सरळ ठेवून ओठ स्ट्रेच करत बाहेरच्या दिशेने वळवा. जसे किस करताना रतो. या स्थितीत 7-8 सेकंदात रहावे. दिवसातून कमीतकमी 5-10 वेळा करा.
=======================================================================================================
हेही वाचा :
Throat घसा खवखवतोय मग करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय
त्वचेसाठी फायदेशीर ठरेल बदामाची साल, असा करा वापर
=======================================================================================================
जबड्याची एक्सरसाइज
डबल चीनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जबड्याची एक्सरसाइज करा. यासाठी डोक डाव्या बाजूला वळून चबडा वरखाली करता. या स्थितीत 5-10 सेकंद थांबा. ही एक्सरसाइज दिवसातून 5 वेळा नक्की करा. (Double Chin Remedies)
टंग स्ट्रेच करा
टंग स्ट्रेचच्या मदतीनेही डबल चीनची समस्या कमी होऊ शकते. यासाठी जीभ बाहेर स्ट्रेच करा आणि नाकाच्या वरच्या बाजूने वळवा. यामुळे डबल चीनच्या आसपास असणारे फॅट्स कमी होण्यास मदत होईल.