Home » दिवाळीत पीठाचा दिवा लावण्यामागे ‘हे’ आहे खास कारण

दिवाळीत पीठाचा दिवा लावण्यामागे ‘हे’ आहे खास कारण

हिंदू धर्मात दिवाळीचा सण फार महत्त्वपूर्ण मानला जातो. तो वर्षभरातील सर्वाधिक मोठा सण असते. दिवाळी येण्यापूर्वीच लोक आपल्या घराची स्वच्छता, सजावट आणि खरेदी करण्यामागे लागतात.

by Team Gajawaja
0 comment
diwali 2023
Share

हिंदू धर्मात दिवाळीचा सण फार महत्त्वपूर्ण मानला जातो. तो वर्षभरातील सर्वाधिक मोठा सण असते. दिवाळी येण्यापूर्वीच लोक आपल्या घराची स्वच्छता, सजावट आणि खरेदी करण्यामागे लागतात. दिवाळीचा उत्साह हा देशभरात पहायला मिळतो.यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. (Diwali 2023)

दिवाळीचे हे पाच दिवस फार आनंदात, उत्साहासात साजरे केले जाता. असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान रामांनी आपला १४ वर्षांचा वनवास पूर्ण करुन अयोध्येत पोहचले होते तेव्हापासून त्या दिवसाला दिवाळीच्या रुपात साजरा करण्यात आला. पाच दिवसांचा हा सण धनतेरस पासून दूर होऊन भाऊबीजेच्या दिवशी पूर्ण होतो.

धनतेरसच्या दिवशी लोक आपल्या घरी दिवे लागतात. दिवाळीच्या सणाला खरंतर दिवे लावून घरात रोषणाई केली जाते. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का, दिवाळीच्या दिवसात पीठाचा दिवा नक्की का लावला जातो?

diwali 2023

diwali 2023

सर्वसामान्यपणे घरात पूजेसाठी आपण पीतळ, तांबे किंवा मातीचा दिवा लावतो. या व्यतिरिक्त तुम्ही काही वेळेस पाहिले असेल की, घरात पीठाचा दिवा सुद्धा लावला जातो. दिवाळीच्या वेळी पीठाचा दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी यमदेवांच्या पूजेसह पीठाचा दिवा सुद्धा लावला जातो.

असे मानले जाते की, या दिवशी यमदेवांसाठी पीठाचा दिवा लावल्याने नरकापासून मुक्ती मिळते. त्यामुळे घरी यमराज यांच्या नावाने दिवा जरूर लावला पाहिजे. लावलेला दिवा घरातील कानाकोपऱ्यात फिरवला पाहिजे. त्यानंतर घराबाहेर दक्षिण दिशेला ठेवावा. (Diwali 2023)

त्याचसोबत पीठाचा दिवा लावल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. दुसऱ्या दिव्यांच्या तुलनेत पीठाचा दिवा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या व्यतिरिक्त अशा दिव्यांमध्ये देवी अन्नपूर्णाचा वास असतो असे मानले जाते. देवी अन्नपुर्णेचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतो.

दिवाळी कॅलेंन्डर 2023
-दिवाळीच्या पाच दिवसाच्या सणाची सुरुवात धनतेरस पासून होते. यंदा धनतेरस 10 नोव्हेंबरला आहे
-धनतेरसच्या दुसऱ्याच दिवशी छोटी दिवाली किंवा नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा छोटी दिवाली 11 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे
-दिवाळी यंदा 12 नोव्हेंबरला आहे
-सर्वसामान्यपणे दिवाळीच्या पुढच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. गोवर्धन पुजा कार्तिक महिन्यातील प्रतिपदा तिथीला होते. त्यामुळे ही पूजा 14 नोव्हेंबरला आहे. याच दिवशी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सुद्धा आहे.
-तर 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे


हेही वाचा- यंदा दिवाळी 11 की 12 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.