श्रावण महिन्यांसोबतच अजून एका महिन्याला पवित्र आणि महत्त्वाचा महिना समजले जाते, आणि हा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिना कृष्णाचा आवडता महिना समजला जातो. या महिन्यात कृष्ण पूजेसोबतच अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. यातलाच एक मोठा सण म्हणजे, ‘दत्त जयंती’. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप म्हणजे भगवान दत्त. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. हा उत्सव विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दत्तात्रेय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता. त्यामुळे दत्तजयंती ही प्रदोषकाळात साजरी केली जाते. (Datta Jayanti)
कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी ही २०२५ मध्ये ४ डिसेंबर रोजी आहे. पौर्णिमा तिथी ४ डिसेंबरला सकाळी ८:३७ वाजता सुरू होऊन ५ डिसेंबरला पहाटे ४:४३ वाजता संपत आहे. उदय तिथीनुसार गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ साजरी करण्यात येणार आहे. बहुतांशी ठिकाणी ‘त्रिमूर्ती’ म्हणजे त्रिमुखे असलेल्या स्वरुपात दत्ताची पुजा केली जाते. तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीचे पूजन केले जाते. दत्ताला ‘अवधूत’ असे देखील म्हटले जाते. दत्त, दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात. (Margashirsha Month)
आपल्या पुराणांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये, त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. आपल्या काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये असेही सांगितले आहे की, दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे. भगवान दत्तात्रेय भगवान विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक मानले जातात. असे सांगितले जाते की, दत्त भगवानांनी सभोवतालचे आणि पर्यावरणाचे निरीक्षण करून ज्ञान संपादन केले होते. (Todays Marathi HEadline)

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. (Marathi News)
दत्त जयंती पूजाविधी
दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्त गुरूंच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी. पूजा करताना अभिषेक देखील केला तरी चालतो. त्यानंतर अष्टगंध लावून दत्त महाराजांना हार फुले अर्पण करावीत. धूप,अगरबत्ती आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यानंतर दत्त महाराजांचा नामजप करावा. दत्त बावनी, गुरुचरित्र अध्याय १६ आणि १८ वाचावा, गुरुलीलामृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदयातील ग्रंथ वाचावेत. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा. दत्त महाराजांना घेवड्याच्या भाजीचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता. दत्त जयंतीच्या आधी अनेक लोकं गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण देखील करतात. याच पारायणाचे पारणे या दिवशी केले जाते. संध्याकाळी दत्त मंदिरांमध्ये आणि अनेक ठिकाणी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. (Top Stories)
दत्त जन्माची कथा
अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’ (Top Trending Headline)
एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ (Top Marathi Headline)

मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ (Latest Marathi News)
मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. (Top Trending News)
========
Datta Jayanti : दत्त जयंती- श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे नियम आणि पद्धत
========
ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
