मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा गुरुवारी ४ डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. देवी अनुसूया आणि ऋषी अत्री यांच्या पुत्र म्हणून भगवान दत्तात्रयाची ओळख आहे. भगवान दत्तात्रेय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात. गाय आणि कुत्रा दोघेही त्याच्या सवारी आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तीची उपासना होते. (Datta Jayanti)
भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणार्या दत्तात्रेयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहिला मिळतो. महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये देखील भगवान दत्तात्रयांचा मोठा भक्त परिवार आहे. मात्र यासोबतच उत्तर भारतात देखील भगवान दत्त यांना मानले जाते. एवढेच नाही तर उत्तर भारतातील एक मोठ्या आणि पवित्र शहरामध्ये दत्ताचे पुरातन मंदिर देखील आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण याच उत्तर भारतातील एकमेव दत्त मंदिराबद्दल जाणून घेऊया. (Marathi)
जगातील वाराणसी हे सर्वात जुने शहर म्हणून ओळखले जाते. गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर अतिशय पवित्र आणि भगवान शंकरांचे वास्तव्य असलेले हे शहर म्हणजे अध्यात्माचे केंद्र समजले जाते. म्हणूनच खास वाराणसी पाहायला, अनुभवायला देश विदेशातून लोकं या शहरात येतात. अशा या सुंदर शहरातच श्री सद्गुरू दत्तांचे मंदिर पाहायला मिळते. उत्तर भारतातील एकमेव दत्त मंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे. येथे एकमुखी दत्तांची मूर्ती पहायला मिळते. (Latest Marathi Headline)

वाराणसीतील ब्रह्मा घाटावर दत्त महाराजांचे हे मंदिर आहे. हे मंदिर केवळ प्राचीनच नाही तर अतिशय अद्भुत देखील आहे. कारण या मंदिराशी संबंधित अनेक अविश्वसनीय अनुभव भक्तांना आले आहेत. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, कोणताही आजार येथे बरा होतो. हे मंदिर अतिशय प्राचीन असून २०० वर्षापेक्षा अधिक जुने आहे. या मंदिरातील शिलालेखावरून ही माहिती समजते. (Top Marathi News)
श्री दत्तात्रयांबद्दल असे सांगितले जाते की, त्यांनी देह त्याग केलेला नाही. ते दिवसरात्र येथेच संचार करत असतात. दत्तगुरूंच्या भक्तांची मान्यता आहे की, दत्तगुरु अमर आहेत. त्यामुळे आजही श्रद्धा भक्तीने एखाद्या व्यक्तीने त्यांचे नाव घेतले तर ते नक्कीच दर्शन देतात. अशी मान्यता आहे की, येथील मनकर्णिका घाटावर रोज पहाटे दत्तगुरु स्नान करण्यासाठी येतात. या घाटावर दत्तगुरूंच्या चरण पादुका आहेत. दत्त मंदिरात जाऊन नुसते दर्शन घेतले तरी त्यामुळे अनेक व्याधीपासून मुक्ती मिळते असे भक्तगण सांगतात. वाराणसीच्या ब्रह्मघाटावर असलेल्या या छोट्या मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. (Top Trending News)
======
Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व
======
वाराणसीच्या ब्रह्मघाटावर असलेल्या या छोट्या मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. असे सांगतात की भगवान परशुराम यांनी त्रिपुर सुंदरीची साधना करण्याचा गुरु मंत्र भगवान दत्तात्रेय यांच्याकडून प्राप्त केला होता. अनेक प्रश्न,संकटे, आजार असलेले व्यक्ती केवळ दर्शनाने बरे होतात. दत्त मंदिरात जाऊन केवळ व्याधींपासून मुक्ती मिळते अशी समजूत आहे.त्यामुळे आजारी लोक, वृद्ध इथे हमखास दर्शनासाठी येतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
