भारतातील मंदिरं आणि या मंदिरांची चर्चा नेहमीच होत असते. अनेक मंदिरं असणाऱ्या भारतामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रथांचे, विविध देवांचे अगणित मंदिरं आहेत. प्रत्येक मंदीर आणि त्याची ख्याती वेगळी असते. अशा या मंदिरांमध्ये एक असे मंदीर आहे, ज्याचे नाव आणि देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादामुळे हे मंदीर खूपच चर्चेत येत असते. कोणते आहे हे मंदीर?, काय हे इथली वेगळी प्रथा?, कोणता वेगळा नैवेद्य देवाला दाखवतात? चला जाणून घेऊया या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं.(Temple)
सामान्यपणे आपल्याकडे देवाला प्रसाद अर्पण करायचा म्हटल्यावर आपण प्रसादामध्ये काय देतो तर पेढे, खडीसाखर अर्थात विविध प्रकारचे गोड पदार्थ शिवाय फळं आणि खास दिवस, सण असेल तर चारी ठाव स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. इथेच हे मंदीर वेगळे ठरते. या मंदिरामध्ये देवाला चक्क मोमोज आणि नूडल्सचा नैवैद्य दाखवला जातो. हे ऐकायला फार विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. या मंदिरात नूडल्स, मोमोज आणि इतर चिनी पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात, जे माँ कालीचा आशीर्वाद मानून भाविकांमध्येही वाटले जातात. (Chini Kali Mata Mandir)
आता तुम्ही म्हणाल, असे कोणते मंदिर आहे जिथे देवाला असा नैवेद्य दाखवतात? तर हे मंदीर आहे ‘चिनी काली माता मंदीर’. कोलकात्यातील टांगरा भागात एक ‘चीनी काली मंदिर’ आहे. हा परिसर चायना टाउन म्हणून ओळखला जातो. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेसाठी आणि सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध नाही तर या अनोख्या परंपरेमुळेही प्रसिद्ध आहे.(Trending News)
=======
हे देखील वाचा : Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !
=======
चिनी काली माता मंदिरात येणारे भाविकही खूपच खास असतात. या मंदिरात तुम्हाला भारतीय लोकांसोबतच चिनी भाविक देखील पाहायला मिळतात. भारतीय किंवा बंगाली भाविकांसोबतच येथे मोठ्या प्रमाणात चिनी लोकं सुद्धा या कालीमातेच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. हे मंदिर तिबेटी शैलीचे असून, या मंदिराच्या परिसरात आपल्याला जुन्या कोलकाता आणि पूर्व आशियातील संस्कृतीचा मेळ पाहायला मिळते.(Latest Marathi News)
मुख्य म्हणजे या मंदिरात चायनीज पदार्थ नैवेद्य म्हणून देवीला अर्पण केले जातात सोबतच येथे लावल्या जाणाऱ्या अगरबत्ती देखील चीनच्या असतात. त्यामुळे या मंदिरात दरवळणारा सुगंध देखील इतर आपल्या मंदिराच्या तुलनेतच खूपच वेगळा आणि खास असतो. चिनी काली माता मंदिरात बंगाली पुजारी पूजा करतात. शिवाय इथे दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी खास प्रसंगी येथे हाताने तयार केलेले कागद जाळण्याची देखील प्रथा आहे.(Marathi Top News)
चिनी काली मंदिराची आख्यायिका
एका मान्यतेनुसार, बऱ्याच वर्षांपूर्वी एक मुलगा खूप आजारी पडला. वैद्यांनी तो बरे होईल याची सर्व आशा सोडून दिली होती. तिथे एका झाडाखाली दोन काळे दगड होते, ज्यांची लोक माता काली म्हणून पूजा करायचे. त्याच झाडाजवळ त्याचे पालक त्याला घेऊन गेले. जिथे त्यांनी काली मातेची प्रार्थना केली आणि काय आश्चर्य तो मुलगा बरा झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन, त्या मुलाच्या पालकांनी काली मातेची पूजा करण्यास सुरुवात केली. बंगाली आणि चिनी समुदायाच्या लोकांनी मिळून या ठिकाणी हे कालीमातेचं मंदिर बांधलं. तेव्हापासून या मंदिराला चिनी काली मातेचं मंदिर असं नाव पडलं.(Social News)
=======
हे देखील वाचा : Shalivahan Shake : जाणून घ्या शालिवाहन शके म्हणजे काय?
=======
नूडल्सचा नैवेद्य का दाखवला जातो?
चिनी स्वयंपाकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नूडल्स. हेच नूडल्स पुढे या मंदिरातील पूजेचा एक भाग बनले. जेव्हा चीनमध्ये यादवी युद्ध सुरू होते तेव्हा अनेक चिनी निर्वासित कोलकात्यात येऊन स्थायिक झाले. येथे आल्यानंतर देखील साहजिकच ते त्यांची संस्कृती आणि परंपरा देखील जपायचे. ज्यामध्ये देवी-देवतांना विशेष पदार्थ अर्पण करण्याची परंपरा देखील समाविष्ट होती. या लोकांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणे काली मातेला नूडल्सचा नैवेद्या अर्पण करण्यास सुरुवात केली, जी हळूहळू मंदिराचा कायमचा नैवेद्यचा भाग बनली. (Top News)