आज बारावीचा निकाल जाहीर झाला. प्रत्येकाच्या आयुष्यात १२ वीच्या परीक्षेला मोठे महत्व असते. याच १२ वी नंतर प्रत्येक विद्यार्थी त्याचे करीयर निवडून उज्ज्वल भविष्याच्या वाटेने प्रवास करू लागतो. १२ वी चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाल्यानंतर चांगले करीयर निवडण्याचा गहन प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आणि त्यांच्या पालकांपुढे असतो. करीयर निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. (Career)
बारावीनंतर करीयरची निवड आपल्या आवडीनिवडीशी निगडीत असायला हवा. आपण जे करीयर निवडू त्याला मार्केटमध्ये डिमांड देखील हवी. आपल्या करियरला योग्य असा जॉब देखील आपल्याला मिळावा. त्याच बरोबर पगारही चांगला मिळायला हवा. आदी अनेक अनेक बाजूनी विचार करून मगच कोणत्या क्षेत्रात करीयर करायचे हे ठरवले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला १२ वी नंतर करियरच्या दृष्टीने काही चांगले करीयरचे पर्याय सांगणार आहोत. (Eductaion)
१) Arts / कला शाखा
आर्टस् आणि स्पर्धा परिक्षा हे समीकरण सध्या खूपच गाजत आहे. आर्टस् म्हणजे कमी मार्क असलेल्या विध्यार्थ्यानी निवडायची शाखा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. किंवा काहींना तर हे फिल्ड फक्त स्पर्धा परिक्षांसाठीचे फिल्ड असल्याचे वाटते. मात्र असे अजिबातच नाहीये या फिल्डमध्ये या व्यतिरिक्त आणखी बरेच करिअर ऑपशन्स उपलब्ध आहेत. (Career Advice)
* B.A Economics: शेअर मार्केट, GDP, बिझीनेस अँड फायनान्स, डिमान्ड अँड सप्लाय अशा अर्थकारणाशी संबंधीत विषयांमध्ये रस असणाऱ्या व्यक्तींनी या क्षेत्रात पदवी मिळवून पुढे त्याला मास्टर्सची जोड दिली तर इन्व्हेस्टमेंट ॲनलिस्ट, इकोनॉमिस्ट, इकोनॉमिक रायटर, बँकर, मार्केट ॲनालिस्ट, ऑपरेशन मॅनेजर या आणि अशा अनेक करिअर संधी चांगल्या पॅकेजसह उपलब्ध होऊ शकतात. (Marathi)
* B.A Fine Arts: आर्ट डिरेक्टर, आर्ट टिचर, कार्टुनिस्ट, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर, ॲनिमेटर, फिल्म मेकिंग अशा एखाद्या क्रिएटीव्ह क्षेत्रात तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर या पदवीचा तुम्ही नक्कीच विचार करा.
* B.A in Political science, History, Geography, Hospitality and Travel, Literature, Animation, Journalism, असे अनेक पदवी अभ्यासक्रम कला शाखेत उपलब्ध आहेत. जर तुम्हाला टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्र, रेडिओमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पत्रकारितेत करिअर करू शकता. येथे टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल मीडियासारखे अनेक नोकरीचे पर्याय आहेत. (Marathi Top News)
=======
हे देखील वाचा :WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit
=======
२) Commerce / वाणिज्य शाखा:
कॉमर्सनंतर पदवी अभ्यासक्रमाचे दोन विभाग: १. Commerce with math २. Commerce without math
‘Commerce with Maths’ मधील पदवी अभ्यासक्रम:
* B. Com in Accounting and Taxation, Statistics, Management and International finance, Applied Eco, Banking and Finance, इ.
* B. Com Accounting and Taxation: या अभ्यासक्रमात टॅक्स सिस्टीम, फायनान्शिअल अकाउंटिंग, VAT, सेंट्रल टॅक्स, फायनान्स, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या विषयासंबंधीचे ज्ञान दिले जाते.
* B. Com in Statistics: या पदवी अभ्यासक्रमात इकॉनोमिक रिसर्च अँड ॲनालिसिस एज्युकेशन कन्सल्टिंग, अप्लाईड इकॉनॉमिक्स, डेटा ॲनालिसिस, इ अभ्यास समाविष्ट आहे.
‘Commerce without Maths’ मधील पदवी अभ्यासक्रम:
* B. Com, B. Com in business administration, marketing, Tourism and Travel management, इ.
* B. Com in business administration: या क्षेत्रात पदवी मिळवल्यानंतर फायनान्स, अकाउंटिंग, मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रातील करिअर संधी खुल्या होतात. तसेच यापुढे आपल्या आवडीच्या विषयात विद्यार्थी MBA देखील करू शकतात.
* B. Com Tourism and Travel management: हा एक तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. यामध्ये टुरिझम क्षेत्राशी निगडित ट्रॅव्हल ऑपरेशन्स, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, टुरिझम मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि सस्टेनेबल टुरिझम इत्यादींचा समावेश आहे. (Top Stories)
३) Science / विज्ञान शाखा:
तुम्ही बारावीची परिक्षा PCB ग्रुप घेऊन उत्तीर्ण झाला असाल तर MBBS, Bachelor of dental surgery, medical lab and technology, Veterinary science and animal husbandry, Physiotherapy, Biotechnology, B.Sc. forensic science, इत्यादी पदवी अभ्यासक्रम तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. (Marathi Trending News)
=======
हे देखील वाचा : WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य
=======
* Veterinary science and animal husbandry: बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स हा पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील पाच वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश प्राण्यांचे पोषण ,उपचार आणि प्रजननासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करणे हा आहे.
* PCMB ग्रुपसाठी Biomedical engineering, Healthcare data mining, Nanotechnology, Robotics, Architecture, Computer application इत्यादींमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
* Nanotechnology (नॅनो टेक्नॉलॉजी): नॅनो टेक्नॉलॉजी हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. सूर्याचा प्रकाश ऊर्जेत रूपांतरित करणे, मानवी शरीरात बसवण्यायोग्य बायो चिपची निर्मिती, हे नॅनो टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाले आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग अनेक क्षेत्रांत होतो. त्यामुळे जगभरात त्यातील नोकर्यांच्या संधीही वेगात वाढत आहेत. (Social News)
* PCM ग्रुप घेऊन परिक्षा उत्तीर्ण झाला असाल तर Bachelor of planning, Technology, computer science hotel management, textile designing इ. पदवी अभ्यासक्रम तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
* Bachelor of planning: या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी JEE ही प्रवेश परीक्षा आहे. या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमानंतर अर्बन प्लॅनर, रीजनल प्लॅनर, प्रोजेक्ट प्लॅनर, डिझाईन आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर अशा करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
याशिवाय काही इतरही अनेक कोर्सेस आहे, जे करून तुम्ही चांगली पत कमाऊ शकता सोबतच चांगला पैसा देखील मिळवू शकता. त्याबद्दल जाणून घेऊया (Marathi Top News)
=======
हे देखील वाचा : Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा
=======
> फॅशन डिझायनिंग : जर तुम्हाला फॅशनमध्ये रस असेल तर तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करू शकता. या क्षेत्रात नाव आणि पैसा दोन्ही कमावता येते.
> ग्राफिक डिझायनिंग : आजच्या काळात, माध्यमांसह अनेक क्षेत्रात ग्राफिक डिझायनिंगची मागणी आहे. जर तुम्हाला सर्जनशीलता आवडत असेल, तुम्ही क्रिएटिव्ह विचार करत असाल तर हे फिल्ड नक्कीच तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. तुम्ही त्याशी संबंधित कोर्स करून घरी बसून लाखो रुपये कमवू शकता.
> सामाजिक कार्य (सोशल वर्क) : आजच्या काळात अनेक लोकं लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून समाजसेवा करताना दिसत आहेत. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एनजीओ आणि सामाजिक सेवा संस्थांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.
> ललित कला (फाइन आर्ट्स) : चित्रकलेची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हाला चित्रकला किंवा शिल्पकलेमध्ये रस असेल तर तुम्ही ललित कलांमध्ये करिअर करू शकता. (Marathi Latest News)
> लॉ (वकिली) : जर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करायला आणि त्याचे ज्ञान राखायला आवडत असेल तर तुम्ही वकील बनू शकता आणि समाजात भरपूर पैसे आणि प्रतिष्ठा मिळवू शकता.
=======
हे देखील वाचा : Afghanistan : तालिबान बुद्धाला शरण !
=======
> जनसंपर्क (PR) : आजच्या काळात, जनसंपर्क (पीआर) नोकऱ्यांना खूप मागणी आहे. जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका म्हणजे संस्थेची किंवा संस्थेची सार्वजनिक प्रतिमा वाढवणे. (Career News In Marathi)
> अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया : अॅनिमेशन आणि मल्टीमीडियाचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. चित्रपट आणि गेमिंग उद्योगात अॅनिमेशनला मोठी मागणी आहे. याशिवाय, कार्टून आणि शिक्षण क्षेत्रातही त्याची मागणी वाढत आहे.
> मनोरंजन उद्योग : आजकाल, अभिनय, चित्रपट निर्मिती किंवा संगीत क्षेत्रात नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला चित्रपटसृष्टी आवडत असेल तर तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता.
> पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन : जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय असू शकतो. या क्षेत्रात मार्गदर्शक, प्रवास सल्लागार आणि प्रवास ब्लॉगर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
> पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम : चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी जाऊ शकता. यासाठी पात्रता निकष म्हणून तुम्हाला बॅचलर डिग्रीची आवश्यकता नाही. 12वी सायन्समधून उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या सर्वात जास्त पगार देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. (Career Guidance)
> एअर होस्टेस किंवा केबिन क्रू : तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत असेल, तुमची पर्सनॅलिटी चार चौघात उठून दिसत असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर एअर होस्टेस किंवा केबिन क्रू हा चांगला पर्याय आहे. देशाअंतर्गत आणि परदेशात जाणाऱ्या विमानांमध्ये एअर होस्टेस किंवा केबिन क्रूचा जॉब तुम्हाला करता येईल.
> इव्हेंट मॅनेजमेंट : सध्या इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. साधा कार्यक्रम जोरात सेलिब्रेट करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हायर केले जाते. त्यामुळे घरातील साधा कार्यक्रम सुद्धा ‘इव्हेंट’ होतो. इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची आजकालच्या तरूणाईमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळते. इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा करू शकता. त्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. किंवा स्वत:चा बिझनेस देखील चालू करू शकता.
> डिजीटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा : डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग कोर्स हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. हा कोर्स ६ महिने ते २ वर्षांचा असतो. या कोर्सनंतर तुम्हाला कंटेंट रायटिंग, एसइओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, लीड जनरेशन, ॲनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट यासारख्या नोकऱ्या सहज मिळतील. याशिवाय तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. (Top Trending News)
> डिप्लोमा इन टॅली ईआरपी : जर तुम्हाला अकाऊंट्स आवडत असेल तर तुम्ही डिप्लोमा इन टॅली ईआरपी कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमात टॅली शिकवली जाते. यानंतर तुम्ही अकाऊंट क्षेत्रातील नोकरीसाठी सहज अर्ज करू शकता.
> डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स : डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप सेट करू शकता. याद्वारे तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील.
> कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बी.कॉम : हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स आहे. ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकवले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला फायनान्स, बिझनेस अकाउंट्स या विषयांबद्दल शिकवले जाते. यानंतर तुम्हाला फायनान्स कंपनीत सहज नोकरी मिळेल.
> डिप्लोमा इन ई-कॉमर्स : हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंगबद्दल शिकवले जाते. या कोर्सनंतर तुम्हाला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळेल. (Marathi News)
> बँकिंगमध्ये डिप्लोमा : या कोर्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित विषय शिकवले जातात. तुम्हाला फायनान्स आवडत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग असे अनेक कोर्सेस आहेत. यामध्ये तुम्हाला बँकिंग कायद्याशी संबंधित विषय शिकवले जातील.
=======
हे देखील वाचा : Virginia Giuffre : ब्रिटीश राजघराण्याला हादरवणारे स्कॅंडल !
=======
> डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट कोर्स : या कोर्समध्ये तुम्हाला ब्रँड, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे मार्ग शिकवले जातात. कोर्स केल्यानंतर तुम्हाला दरमहा ५० हजार ते लाखापर्यंत पगार मिळतो.
> एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम : जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या जागरुकतेसह, पर्यावरण विज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. बारावीनंतर तुम्ही एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम केला तर तुम्हाला विविध दृष्टीकोन, अत्याधुनिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याची संधी मिळू शकते.