प्रत्येकालाच चहा किंवा कॉफी पिणे आवडते. आता तर विविध प्रकारच्या चहा आणि कॉफी सुद्धा आपल्याला सहज उपलब्ध आहेत. अशातच लॉकडाउनमध्ये आपण पाहिले डालगोना कॉफीची फार क्रेझ आणि ट्रेंन्ड आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून बुलेटप्रुफ कॉफी (Bulletproof coffee) पिण्याचा ट्रेंन्ड अधिक वाढला आहे. काही सेलिब्रेटिजच्या डाइटमध्ये सुद्धा याच कॉफीचा समावेश दिसून येतो.परंतु या कॉफीचा आता जरी ट्रेंन्ड आला असला तरीही याचा वापर गेल्या काळापासून केला जात आहे. मात्रचीवर याला बुलेटप्रुफ कॉफी असे नाव दिले गेले आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, हिमालयात राहणारी लोक दीर्घकाळापासून ही कॉफी पित आहेत. येथील कॉफीमध्ये बटरचा वापर केला जातो. त्यामुळेच त्याला बटर कॉफी सुद्धा म्हटले जाते. अधिक उंचीवर राहणारी लोक याचा प्रकारच्या ड्रिंक्सचा वापर अधिक करतात.
-‘या’ कारणास्तव कॉफीमध्ये बटरचा वापर केला जातो
रिपोर्टनुसार हिमालयातील शेरपा आणि इथियोपियाच्या गुरेज समुदायातील लोक दीर्घकाळापासून कॉफीत बटरचा वापर करत आले आहेत. उंच ठिकाणी राहणारी लोक अधिक उर्जा मिळावी म्हणून आपल्या कॉफी किंवा चहा मध्ये बटर मिसळतात. कारण उंच क्षेत्रात राहणाऱ्या आणि काम केल्यामुळे त्यांना अधिक कॅलरीज लागतात. या व्यतिरिक्त नेपाळ आणि भारतात हिमालय क्षेत्रांसह चीन मधील काही क्षेत्रातील लोक खासकरुन याक पासून तयार करण्यात आलेले बटरचा वापर करुन चहा पितात. तर तिबेटात बटर टी, या पो चा, एक पारंपरिक पेय आहे.
हे देखील वाचा- फ्रिजमध्ये कधीच ठेवून नका ‘या’ भाज्या, आरोग्यासाठी ठरतील घातक

–बटर कॉफी कशी झाली बुलेटप्रुफ कॉफी?
बटर कॉफीला बुलेटकॉफीत रुपांतर करण्याचे श्रेय अमेरिकन उद्योजक डावे एस्प्रे यांना जाते. त्यांनी २०१३ मध्ये याची सुरुवात केली होती. दरम्यान, याचे काही बुलेट सोबत कनेक्शन नाही आहे. फक्त त्याचे असेच नावे ठेवले आहे. सध्या अमेरिका, ब्रिटेन आणि कॅनडामध्ये ही कॉफी बहुतांश प्रमाणात प्यायली जाते. अशातच आता भारतात सुद्धा याची लोकप्रियता वाढत आहे. काही भारतीय सेलिब्रेटी सुद्धा बुलेटप्रुफ कॉफीचा वापर करतात.
-फॅट बर्न करते ही कॉफी
तज्ञाचे असे म्हणणे आहे की, यामध्ये अँन्टीऑक्सिडेंट्स पुरेशा प्रमाणात असतात. कॉफी शरिरातील फॅट कमी करण्याची मदत करतात. बटरमध्ये काही प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरिरासाठी महत्वाची असतात. याचे काही फायदे सुद्धा आहेत. सध्या बटरकॉफीचा वापर काही फायद्यासाठी केला जातो पण खासकरुन वेट लॉससाठी ती अधिक प्यायली जाते.