Blood Pressure : अनेक लोकांना वाटते की ब्लड प्रेशर फक्त जास्त किंवा कमी झाले तरच हृदयाला धोका निर्माण होतो. परंतु अलीकडील रिसर्चमध्ये असा धक्कादायक खुलासा झाला आहे की ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये असतानाही हार्टवर डॅमेज सुरू होऊ शकते. ज्यांचा BP नियमितपणे मर्यादेच्या वरखाली होतो किंवा स्ट्रेस, चुकीचा आहार आणि स्लीप पॅटर्नमुळे अस्थिर राहतो, त्यांच्यात हा धोका अधिक दिसून येत आहे. म्हणजेच BP रिपोर्ट नॉर्मल आला, तरी हृदय पूर्णपणे सुरक्षित आहे असे समजणे चुकीचे ठरू शकते. (Blood Pressure)
स्टडीमध्ये काय उघड झाले? या संशोधनात हजारो प्रौढ व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला. परिणामांनुसार असे निदर्शनास आले की 120/80 mmHg या नॉर्मल BPच्या रेंजमध्ये असणाऱ्या व्यक्तींतही हार्ट मास आणि हार्ट वॉल थिकनेस वाढताना दिसले, जे पुढे जाऊन हृदयविकार आणि हार्ट फेल्युअरसाठी जबाबदार ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, नियमित BP चढउतार हृदयावर “साईलेंट डॅमेज” करू शकतात आणि हा धोका रिपोर्ट नॉर्मल असूनही लक्षात येत नाही. वय, जाडेपणा, धूम्रपान, मीठाचे जास्त सेवन आणि ताणतणाव असलेल्या लोकांत धोका अधिक. (Blood Pressure)

Blood Pressure
नॉर्मल BP असूनही कोणाला जास्त धोका? तज्ञांच्या मते, खालील व्यक्तींमध्ये हृदयाला नुकसान होण्याची शक्यता अधिक असते सतत तणावाखाली राहणारे
कमी झोप घेणारे किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे जंक फूड आणि जास्त मीठाचे सेवन करणारे बसून काम करणारे आणि शारीरिक हालचाल कमी असलेले
कौटुंबिक इतिहासात हार्ट डिसीज असणारे अशा लोकांचा BP टेस्टच्या वेळी नॉर्मल दिसू शकतो, परंतु हार्टवर परिणाम मात्र शांतपणे सुरू असतो.
=======================
हे देखिल वाचा :
Heart Attack : हिवाळा सुरू होताच हार्ट अटॅकच्या केसेस का वाढतात? डॉक्टरांनी सांगितले 4 मोठी कारणे
Hormonal Imbalance : हॉर्मोनल बॅलन्स बिघडला आहे का? शरीर देतोय हे 5 संकेत, दुर्लक्ष करू नका!
Winter Health Care : थंडीत हातापायाला सूज येण्याची कारणे काय? यापासून बचाव कसा करावा
========================
हार्ट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? तज्ज्ञ सुचवतात की फक्त BP रिपोर्टवर अवलंबून न राहता संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष देणे गरजेचे आहे.संतुलित आहार, मीठ नियंत्रित ठेवणे, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम, पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबतच दर 6–12 महिन्यांनी BP चेक, ECG, लिपिड प्रोफाइल व शुगर टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. हार्टमध्ये कोणतीही संभाव्य समस्या लवकर लक्षात आली तर उपचार अधिक प्रभावी ठरतात. नॉर्मल BP असल्याचा आनंद घेत बसण्याऐवजी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रिव्हेन्शन आणि हेल्दी लाइफस्टाइल सर्वात महत्त्वाची आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे की ब्लड प्रेशर सामान्य असले तरी शरीराचे संकेत, जीवनशैली आणि स्ट्रेसकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठा धोका संभवतो. (Blood Pressure)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
