लहान मुलांची दूध पिण्याची सवय कमी झाल्यानंतर ते आपण जे अन्नपदार्थ खातो ते त्यांना द्यायला सुरुवात करतो. आपल्या घरात किंवा मित्राचे एखादे मुलं हे सहा महिन्याचे झाल्यानंतर त्याच्या आहारात मसाल्याचे पदार्थ देण्यास सुरुवात करावी असा सल्ला दिला जातो. परंतु बहुतांश डॉक्टर असा सल्ला देतात की, मुलं हे आठ महिन्याचे झाल्यानंतर त्याच्या आहारात मसाले टाकणे सुरु केले पाहिजे. कारण लहान मुलांना पोटाच्या समस्येसह एखाद्या अॅलर्जिपासून दूर ठेवता येते. मसाल्याचा अर्थ लाल किंवा काळी मिरी असे नव्हे तर लहसूण, आलं, हिंग, जीर, धणे, मेथी आणि हळद या सर्वांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. हे मसाले लहान मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतातच पण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्यास मदत करतात.(Kids food care)
बेबीसेंटर डॉट इनच्या नुसार, लहान मुलांना पोटदुखीपासून दिलासा देम्यासाठी आणि पचनात मदत करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधांमध्ये हिंग, आलं, जीर आणि बडीशोपचा वापर केला जातो. तज्ञांच्या मते लहसूण आणि हळदीत अँन्टीसेप्टिक, अँन्टी-इन्फ्लेमेटरी सारखे तत्व सुद्धा असतात. जे लहान मुलांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात.
-हळद
डाळ आणि भाज्यांमध्ये तुम्ही एक चिमुटभर हळद टाकून लहान मुलांना खायला देऊ शकता. हळदीच्या सेवनाने त्याची पाचनक्रिया सुरळीत राहिलच पण रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढेल. तसेच अॅलर्जीपासून ही दूर रहाता येईल. हळद ही लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
हे देखील वाचा- प्रेग्नेंसीदरम्यान अधिक वजन वाढलेय? नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स
-मिर्ची पाउडर
मुलांच्या जेवणात मिर्ची पाउडरचा वापर दीड वर्षानंतर केला पाहिजे. तेव्हा सुद्धा अगदी कमी प्रमाणात याचा वापर करावा असे सांगितले जाते. तिखट पदार्थ लहान मुलांना खायला देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाची असते.(Kids food care)
-लहसूण आणि आलं
लहान मुलांसाठी चिकन तयार करत असाल तर त्यावेळी लहसूण किंवा आलं हे अगदी बारीक तुकड्यांमध्ये कापून टाकावे. परंतु याचे प्रमाण ही अगदी कमी असावे.कारण ते गॅस्ट्रिक समस्यांपासून दूर ठेवतात. लहसूण तुम्ही मुलाला ८-१० महिन्यानंतर देऊ शकता. परंतु आलं हे तुमच्या लहान मुलाला २ वर्षानंतरच द्यावे.
-जीरं
जीऱ्याचे पदार्थ सुद्धा लहान मुलांना ८ महिन्यानंतर द्यावेत. जीरं हे नेहमीच लहान मुलांना देताना एक लहान चमचा तुपात तडका टाकून डाळ, भात किंवा भाजीत टाकता येऊ शकते.
-मेथीचे दाणे
१८ महिन्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला मेथीच्या दाण्याचा त्याच्या आहारात समावेश करु शकता. याचा वापर तुम्ही इडली-डोसा, भाजी किंवा कढीमध्ये केला जाऊ शकतो. यामुळे लहान मुलाची पाचन क्रिया सुरळीत आणि उत्तम राहते.