Home » Linga Devi : समंथाने केलेले ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’ने केलेले लग्न म्हणजे काय?

Linga Devi : समंथाने केलेले ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’ने केलेले लग्न म्हणजे काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Linga Devi
Share

सोमवारपासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू कमालीची गाजत आहे. समंथाची फॅन फॉलोविंग केवळ साऊथपुरतीच नाही तर संपूर्ण जगात आहे. १ डिसेंबर रोजी समंथाने तिचा प्रियकर असलेल्या दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केले. अभिनेता नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर चार वर्षांनंतर समंथाने राजशी दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर समंथाने इन्स्टाग्रामवर तिच्या या लग्नाचे निवडक फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. (bhuta shuddhi vivaha)

तामिळनाडूमधल्या कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंगा भैरवी देवीसमोर राज आणि समंथा यांनी ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’नुसार लग्न केले आहे. केवळ ३० पाहुण्यांच्या उपस्थित तिने लग्न केले आहे. समंथाने तिचे लग्न प्राचीन पद्धतीनुसार केले आहे. मात्र आजच्या काळात जास्त कोणालाच या ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’बद्दल फारशी माहिती नाही. या विधीमध्ये लिंगा भैरवीला साक्ष ठेवले जाते. ही एक प्राचीन योगिक लग्नाची परंपरा आहे. योगसाधनेमध्ये विवाहाच्या या परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच भूत शुद्धी विवाहपद्धतीबद्दल माहिती जाणून घेऊया. (Marathi News)

‘भूत शुद्धी विवाह’ म्हणजे काय?
‘भूत शुद्धी विवाह’ ही एक प्राचीन योगिक विधी आहे. या विधीदरम्यान बंधनापूर्वी जोडप्याच्या शरीरातील पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना शुद्ध केले जाते. ही योगिक परंपरा जोडप्याला तात्विक आणि अध्यात्मिक स्तरावर एकमेकांशी खोलवर जोडण्यास मदत करते. यामुळे वधू आणि वरांमधील केवळ विचार किंवा भावनांपुरतेच नाही, तर ऊर्जा स्तरावरही खोल बंधन निर्माण होतात. हा विवाह लिंग भैरवी देवीच्या आशीर्वादाने संपन्न होतो. या लग्नसोहळ्यात मंत्राचे उच्चारण, पवित्र अग्नीला प्रदक्षिणा आणि इतर विशेष मंत्रासह लग्नविधी पार पडतो. (Entertainment Headline)

Linga Devi

लिंग भैरवी किंवा काही निवडक ठिकाणी संपन्न होणाऱ्या या लग्नसोहळ्यादरम्यान जोडप्यातील पंतमहाभूतांची शुद्धी केली जाते आणि त्यांचं वैवाहिक बंधन अधिक पवित्र, भक्कम केलं जातं. वैवाहिक जीवनात देवीची कृपा सदैव राहण्यासाठी कृपा, सुख, शांती, समृद्धी आणि अध्यात्मिक संतुलनाकरता पूजाविधी होतो. यामध्ये लिंग भैरवी देवीची उपासना एक महत्त्वाची बाब आहे. (Top Marathi HEadline)

भूत शुद्धी विवाहाची प्रक्रिया
पाच तत्त्वांचे शुद्धीकरण केले जाते. या विवाह प्रक्रियेत शरीरातील पाच तत्वे- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश शुद्ध होतात. ही प्राचीन प्रक्रिया जोडप्यांना मूलभूत पातळीवर एकमेकांशी खोलवर जोडण्यात मदत करते. हा सदगुरूंनी रचलेला योगिक पद्धतीवर आधारित एक विधी आहे. हे लग्न लिंग भैरवी देवीच्या आशीर्वादाने संपन्न होते. या लग्नांमध्ये होणारे विधी आणि ही प्रक्रिया जोडप्याला मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिकरित्या शुद्ध करते, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समृद्ध होते. या विधीमध्ये मंत्रांचा जप, पवित्र अग्नीची प्रदक्षिणा आणि इतर विशेष मूलभूत मंत्रांसह विधींचा समावेश असतो. (Marathi Trending News)

मुख्य म्हणजे या भूत शुद्धी विवाहपद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर देखील जोडपे त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा आपापल्या परंपरेनुसार आणि रीतीनुसार लग्न करू शकतात. या विवाहपद्धतीत पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या प्रत्येक पंचमहाभूतातील तत्वासाठी पाच फेरे असतात. पाच फेऱ्यांनंतर लिंग भैरवी देवीचे पेंडंट आणि हळकुंडाचे मंगळसूत्र वधूला घातले जाते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तात्विक मंत्रोच्चारण केले जातात. (Top Stories)

========

Audumbar Tree : औदुंबर वृक्षाचे महात्म्य आणि कथा

Temple : भारतातील ‘या’ मंदिरामध्ये मासिक पाळीमध्ये देखील मिळतो महिला प्रवेश

========

लिंग भैरवी देवी कोण आहे?
अध्यात्मिक गुरू सदगुरूंनी लिंग भैरवीची स्थापना केली. लिंग भैरवी हे एक शक्तिशाली देवीचे स्वरुप आहे. ही देवी स्त्री ऊर्जेचं प्रचंड आणि करुणामयी रुप मानली जाते. लिंग भैरवी हे ईश्वरी स्त्रीत्वाचे उग्र आणि करुणामय रूप असून सद्गुरू यांनी ईशा योग केंद्रात प्राण प्रतिष्ठाद्वारे स्थापित केले आहे. ही ऊर्जा जीवन समृद्ध करण्यास मदत करतं आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भक्तांना आधार देते. शरीर, मन आणि ऊर्जा स्थिर करण्यास ते उपयुक्त ठरते. त्यांना सृष्टी आणि रहस्येचे द्वार मानले जाते, जी भक्तांना भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही पद्धतीने आयुष्यचं महत्त्व समजण्यास मदत करते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.