Home » Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व

Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Datta Jayanti
Share

येत्या ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहिला मिळतो. दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते आणि त्यांना योगाचे अधिपती म्हणून पूजले जाते. भगवान दत्तांना मानणारा मोठा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ ‘दिलेला’ किंवा ‘अनुभूती’ असा आहे. पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. (Datta Jayanti)

पुराणात त्यानुसार, श्री सद्गुरू दत्तांचे स्वरूप ३ चेहऱ्याचा ६ हाताचा त्रीदेवमय मानले जाते. चित्रात त्यांच्या मागे एक गाय आणि ४ कुत्री दिसत आहेत. पुराणात अशी मान्यता आहे की दत्तात्रेय भगवान गंगा स्नानासाठी आले होते म्हणून गंगाच्या काठावर दत्त पादुकाची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेय यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. येथे त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेय यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले असा विश्वास आहे. (Marathi)

भगवान दत्तात्रेय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात. गाय आणि कुत्रा दोघेही त्याच्या सवारी आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तीची उपासना होते. भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणार्‍या दत्तात्रेयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात. भगवान दत्तात्रयाची पूजा करणारा दत्त संप्रदाय मानणारा मोठा समाज आहे. भगवान दत्तात्रयाची भक्ती आपण अनेक प्रकारे करू शकतो. यातलीच एक पद्धत म्हणजे ‘दत्त परिक्रमा’. (Todays Marathi Headline)

दत्ताची भारतात अनेक मंदिरं आहेत. मात्र त्यातही यातल्या २४ मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. याच २४ स्थानांना भेट देणे म्हणजेच ‘दत्त परिक्रमा’. दत्त परिक्रमा करणे म्हणजे एक अध्यात्मिक यात्राच आहे. श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ देणारी परिक्रमा आहे. श्री दत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत अशात जगद्गुरू होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके. (Marathi News)

श्रीदत्त परिक्रमा केल्यानें भक्ताची शक्तिकेंद्रे जागृत होतात असे सांगितले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. महाराष्ट्रात १२ ठिकाणे आहेत. दोन ठिकाण आंध्र प्रदेश, सहा ठिकाणी कर्नाटक आणि चार ठिकाण गुजरात या राज्यांमध्ये आहे. श्री दत्त परिक्रमा ही एकूण साधारण तीन हजार ६०० किमीचा प्रवास आहे. दत्त परिक्रमेची सुरुवात श्रीशंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते. (Latest Marathi Headline)

Datta Jayanti

श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहेत. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघतं. याची अनुभूती काही वेगळीच आहे. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणाची अनुभूती घेऊन साधक स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते. दत्त परिक्रमा केल्याने साधकाच्या मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते. (Top Marathi News)

दत्त परिक्रमेतील २४ ठिकाणं कोणती?
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी
५. अमरापूर
६. पैजारवाडी
७. कुडुत्री
८. माणगाव
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड
११. कुरवपूर
१२. मंथनगुडी
१३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर
१७. अक्कलकोट
१८. लातूर
१९. माहूर
२०. कारंजा
२१. भालोद
२२. नारेश्वर
२३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर

श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते. (Top Trending Headline)
दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन
१. श्रीपाद श्रीवल्लभ
२. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज
३. श्रीस्वामी समर्थ महाराज
४. श्रीमाणिकप्रभू महाराज
५. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर
७. चिदंबर दीक्षित स्वामी महाराज
८. दीक्षित स्वामी महाराज
९. गुळवणी महाराज
१०. चिले महाराज
११. श्रीधर स्वामी
१२. श्री सायंदेव
१३. श्री सदानंद दत्त महाराज
१४. रंगावधूत महाराज
१५. श्रीशंकर महाराज

=========

Datta Jayanti : यंदा दत्त जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्व

Datta Jayanti : दत्त जयंती- श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे नियम आणि पद्धत

=========

श्रीदत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सहवासातच घालवतो. श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यात गेला आहे. कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठय़ा नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो. गाणगापूर येथे भीमा- अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते. याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते. इतर अनेक लहानमोठय़ा नद्यांचे दर्शन होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.