Home » Home Vastu Tips : घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी वास्तु टिप्स 

Home Vastu Tips : घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी वास्तु टिप्स 

by Team Gajawaja
0 comment
Home Vastu Tips
Share

Home Vastu Tips : घर हे फक्त राहण्याचं ठिकाण नसतं  ते आपल्या मन:शांतीचं, ऊर्जेचं आणि भावनिक संतुलनाचं केंद्र असतं. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा  असते तेव्हा कुटुंबात आनंद, प्रेम आणि शांतता नांदते. वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय ज्ञान आहे जे घरातील ऊर्जेचा संतुलित प्रवाह राखण्यासाठी उपयुक्त आहे.  महिलांसाठी, ज्यांचा बहुतांश वेळ घरात आणि त्याच्या देखभालीत जातो, या वास्तु टिप्स खूप उपयुक्त ठरतात.

सर्वप्रथम घराचा प्रवेशद्वार स्वच्छ आणि आकर्षक ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घराचं दार हे सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार मानलं जातं. रोज सकाळी पाणी आणि थोडं मीठ टाकून दारासमोर स्वच्छता करा. ताज्या फुलांनी किंवा सुंदर तोरणाने  लावा. लक्षात असुद्या दाराजवळ अंधार, धूळ किंवा जुन्या वस्तू ठेवल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा साचते. तसेच, पश्चिम किंवा उत्तर दिशेकडचं मुख्य दार शुभ मानलं जातं.(Home Vastu Tips )

Vastu Tips for Home

Vastu Tips for Home

 

घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा यांचा मुक्त प्रवेश असावा. खिडक्या उघड्या ठेवा, घरात सूर्यकिरण येऊ द्या वास्तुशास्त्रानुसार उजेड असलेल्या  घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. दिवसभरात कमीत कमी एक तास सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे, किचन आणि हॉल  मध्ये . सुगंधी अगरबत्ती, कपूर किंवा लवंग यांचा धूर वातावरण शुद्ध ठेवतो आणि मन प्रसन्न करतो.

घरातील वस्तूंची मांडणी ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. अस्ताव्यस्त वस्तू, न वापरलेली कपडे किंवा तुटलेली वस्तू लगेच काढून टाका. घरात फुलझाडं, तुळस किंवा मनीप्लांट लावा ही झाडं केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर सकात्मक ऊर्जा  निर्माण करतात. फुलांच्या पाकळ्या किंवा छोटा पाण्याचा बाउल ठेवल्यास वातावरण अधिक शांत आणि प्रसन्न वाटतं.(Home Vastu Tips )

===================

हे देखील वाचा :

Diwali : दिवाळीसाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स                                    

Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न        

 Organizing Tips For Home : कपाट, किचन आणि घर व्यवस्थित ठेवण्याच्या ५ ट्रिक्स    

=====================

किचनमध्ये पूर्व किंवा आग्नेय दिशा सर्वात योग्य मानली जाते. तिथे काम करताना चेहरा पूर्वेकडे असावा. मीठ आणि धान्याचे डबे नीट लावलेले असावेत कारण ते समृद्धीचं प्रतीक आहेत. घरात दररोज घंटा वाजवणं, ओमचा उच्चार करणं किंवा मंत्र पठण केल्याने सकारात्मक वाढते . या साध्या सवयी घरातील उर्जा वडवतात.

घरातील वातावरण हे आपल्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतं जसं आपण आनंदी, प्रेमळ आणि शांत राहतो, तसंच घरही आपल्याला त्याच ऊर्जेने परत उत्तर देतं. म्हणूनच घरात नेहमी हसणं, गप्पा आणि सकारात्मक विचारांचं वातावरण ठेवा. थोड्या वास्तु टिप्स, थोडी स्वच्छता आणि भरपूर सकारात्मकता  एवढंच पुरेसं आहे तुमचं घरात चांगली सकारात्मक उर्जा ठेवण्यासाठी.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

                                                            


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.