Home » Navi Mumbai : भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल आणि सर्वात सुरक्षित’ एअरपोर्टची वैशिष्ट्ये

Navi Mumbai : भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल आणि सर्वात सुरक्षित’ एअरपोर्टची वैशिष्ट्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navi Mumbai
Share

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन झाले आहे. मागील अनेक वर्षांपासूनचे सगळ्यांचेच स्वप्न आज अखेर प्रत्यक्षात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ८ ऑक्टोबर रोजी बहुप्रतिक्षित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन केले आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. दरम्यान मोदी यांनी या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. या नवीन विमानतळामुळे विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा मोठा ताण कमी होईल आणि ही भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. (DB Patil Airport)

आज या डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणामुळे मुंबई आता त्या काही मोजक्या जागतिक शहरांपैकी एक ठरले आहे जिथे एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत, जसे की लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो. डी. बी. पाटील हे जगातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ असून याची सुरुवात डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे विमानतळ केवळ एक वाहतूक केंद्र नाही, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. (Narendra Modi)

हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत अंतर्गत CIDCO आणि अदानी एअरपोर्ट होल्डींग्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे.आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले असून, हा टप्पा सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला ९ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. या विमानतळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याबद्दल जाणून घेऊया. (Airport)

Navi Mumbai

========

Ship wreck Story : ७० फुट लाटा, समुद्रात जहाजाचे दोन तुकडे, आणि मग..

Miracle in the Amazon : १०,००० फुटांवरून पडून जिवंत !

========

भारताचे पहिले संपूर्ण डिजिटल विमानतळ
नवी मुंबई विमानतळ हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ असून, ते ‘डिजीयात्रा’ सुविधेसह इतर सर्वच आधुनिक सुविधा पुरवण्यास सक्षम आहे. येथे AI वर आधारित स्वयंचलित टर्मिनल प्रणालींद्वारे प्रवाशांना कायम कागदविरहित अनुभव मिळणार आहे. सध्या भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी ६४ टक्के प्रवासी हे GenZ व मिलेनियल्स पिढीतले आहेत. ही पिढी ‘डिजीयात्रा’चा पर्याय निवडून बोर्डिंगदरम्यानचा वेळ वाचवते, रांगेत उभं राहणं टाळते. त्यामुळे येथे अत्याधुनिक आणि सुरक्षित अशी डिजीयात्रा सुविधा कार्यान्वित केली आहे. ज्यामुळे इमिग्रेनशनच्या रांगांपासून प्रवाशांची सुटका होईल. गेटबाहेर कमी रांगा दिसतील. (Marathi News)

प्रवासी क्षमता
पहिल्या टप्प्यात या विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्षी दोन कोटी असणार आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर चार टर्मिनल्स आणि दोन धावपट्ट्यांसह हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष (नऊ कोटी) प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी हे दुबई किंवा हीथ्रो विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्राप्रमाणे (International Aviation Hub) करण्यात आली आहे. (Navi Mumbai Airport)

विमानतळ प्रवेशद्वार
या विमानतळाला चार प्रवेशद्वारं असून अल्फा, ब्राव्हो व चार्ली अशी तीन सेंटर्स (व्यवस्थापन केंद्र) असतील, जिथून सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे व्यवस्थापन केले जाईल. विमानतळावर एकूण ८८ चेक-इन काउंटर्स असतील, त्यापैकी ६६ पारंपरिक काउंटर व २२ सेल्फ चेक-इन काउंटर असतील. (Navi Mumbai)

आकर्षक वास्तुकला
प्रसिद्ध ‘झाहा हदीद आर्किटेक्ट्स’ यांनी डिझाइन केलेल्या या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित आहे. तिचे स्तंभ उलगडणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसतात, जे आधुनिकतेचे प्रतीक आहे. (Marathi)

मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी
नवी मुंबई विमानतळ हे भारतातील पहिले प्रमुख हवाई वाहतूक केंद्र असेल जे एक्सप्रेसवे, मेट्रो लाईन्स, उपनगरीय रेल्वे आणि विशेषतः वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतूक प्रणालींनी जोडलेले असेल. (Marathi News)

उड्डाणाचा टाईम
सुरुवातीच्या काळात या विमानतळावरून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विमानांची उड्डाणं असतील. या विमानतळाची क्षमता ४० एटीएम असून सुरुवातीला १० एटीएम चालू असतील. म्हणजेच प्रतितास १० विमानं उड्डाणं किंवा लँडिंग करू शकतील. (Todays Marathi Headline)

सस्टेनेबल ग्रीन विमानतळ
शाश्वतता लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या विमानतळात ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता आहे. तसेच ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ (SAF) साठवण सुविधा आणि ईव्ही बससेवांचा समावेश आहे. (Marathi Trending News)

धावपट्ट्या
या विमानतळावर ४ टर्मिनल्स आणि ३,७०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद अशा २ समांतर धावपट्ट्या असतील. सध्या केवळ एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू असेल. दुसऱ्या टर्मिनलची डिझाइन प्रक्रिया चालू आहे. अदाणी समुहाने पहिल्या टप्प्यात २० हजार कोटी रुपये गुंतवले असून दुसऱ्या टप्प्यासाठी ३० हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. (Top Marathi Headline)

Navi Mumbai

प्रवाशांचा वेळ वाचवणार
प्रवाशांच्या प्रतीक्षा वेळेत कपात करण्यासाठी टर्मिनलमध्ये ६६ चेक-इन काउंटर आणि २२ सेल्फ-बॅगेज ड्रॉप पॉइंट्स आहेत. भविष्यात चारही टर्मिनल्सना जोडणारी ‘ऑटोमेटेड पीपल मूव्हर’ (APM) सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. (Top Stories)

मालवाहतूक केंद्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात मोठं एमआरओ केंद्र उभारलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख मेट्रिक टन वार्षिक मालवाहतूक क्षमतेसह हे केंद्र कार्यान्वित केलं जाईल. अंतिम टप्पा सुरू होईल तेव्हा येथून वार्षिक ३२ लाख मेट्रिक टन मालवाहतूक होईल. (Latest Marathi News) 

आर्थिक विकासाचे इंजिन
या प्रकल्पामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असून, नवीन औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासाला गती मिळेल. (Top Marathi Stories)

आधुनिक लँडिंग प्रणाली
या विमानतळावर Category II Instrument Landing System बसवण्यात आली आहे, ज्यामुळे केवळ ३०० मीटरपर्यंतची दृश्यमानता असली तरी सुरक्षित लॅन्डिंग होऊ शकते. दाट धुकं अथवा पावसाळ्यात ही सिस्टिम उपयोगी पडेल. मुंबई विमानतळावर लॅन्डिंगसाठी ५५० मीटरपर्यंतची दृश्यमानता लागते. हे सर्व हवामानात कार्यरत राहणाऱ्या विमानतळासाठी मोठे पाऊल आहे. (Top Marathi News)

कार्गो आणि एमआरओ हब
प्रवासी वाहतुकीबरोबरच एनएमआयए भारतातील सर्वात मोठे ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल’ (MRO) केंद्र ठरणार आहे. हे विमानतळ दरवर्षी ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळेल. (Latest Marathi Headline)

फूड हॉल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फूड कोर्टऐवजी फूड हॉल असणार आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या काउंटरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याऐवजी ते एकाच वेळी अनेक आउटलेटवरून प्री-ऑर्डर करू शकतात आणि त्यांना एकत्रितपणे त्याची डिलिव्हरी मिळेल. Wagamama, Coco Café, Bombay Bond, KFC, Bombay Brasserie, Bayroute, Foo सारखे फूड आउटलेट्स येथे उपलब्ध असतील. मॉलमधील फूड एरिया प्रमाणे या विमानतळावर फूड हॉल असेल. मध्ये बसण्याची व्यवस्था आणि चारही बाजूला फूड आउटलेट्स. तसेच विमानतळाच्या अ‍ॅपद्वारे बोर्डिंग गेटवर ऑनलाइन फूड ऑर्डर करता येईल. (Top Trending Headline)

========

The Dragon Triangle : पृथ्वीवरचं दूसरं रहस्यमयी बरमुडा ट्रायंगल ?

========

व्यावसायिक उड्डाणे लवकरच सुरु होणार
आज या विमानतळाचे उद्घाटन जरी झाले असले तरी व्यावसायिक उड्डाणे हे डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होतील. उद्घाटनानंतर ४५ ते ६० दिवसांनी पहिले उड्डाण घेण्याची शक्यता आहे. ‘इंडिगो’, ‘एअर इंडिया’ आणि ‘अकासा एअर’ सारख्या प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांनी इथे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विविध सुरक्षा, इमिग्रेशन आणि कस्टम एजन्सी एकत्रित केल्यानंतर डिसेंबरच्या सुमारास एनएमआयए एकाचवेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होईल अशी शक्यता आहे. (Top Trending News)

मल्टी-कनेक्टेड विमानतळ
या विमानतळाची वैशिष्ट्ये अशी आहेत कि हे मेट्रो, रेल्वे आणि जलमार्ग या सर्व वाहतूक प्रणालींना जोडणार असून, त्यामुळे भारताचे पहिले मल्टी-कनेक्टेड विमानतळ ठरेल. ग्रीन टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल बिल्डिंग पद्धती वापरून विमानतळाची रचना करण्यात आली आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.