आजपासून साधारण १३-१४ वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. तारीख तशी कोणाला माहिती नाही, पण एक भविष्यवाणी झाली होती, आठवतेय का? चला, एक हिंट देतो. ‘वर्ष २०१२!’, आठवलं असेलच.. तेव्हा एक भविष्यवाणी गाजली होती, ती म्हणजे ‘२१ डिसेंबर २०१२ला जग नष्ट होणार!’ आता डोक्यात पटापट फ्लॅशबॅक गेले असतील ना? २१ तारखेच्या आधी असं करू.. तसं करू.. आपल्या इच्छा पूर्ण करू.. असं म्हणणारेही होते, तर काहींना वाटत होतं, ‘ही तर फक्त अफवा आहे!’ हॉलीवुडने तर यावर २०१२ नावाने फिल्म सुद्धा बनवली. आता हा गंमतीचा भाग झाला, आणि त्या विषयाला १३ वर्ष झाली. (The Maya Mystery)
पण ही भविष्यवाणी कोणी केली आठवंतय का?..नाही आठवणार, कारण आपल्याला या बाबतीत ठोस माहिती नाही. याची फक्त भरपूर चर्चा झाली होती. आता हा फोटो बघा.. हा फोटो त्याच काळात खूप चर्चेत आला होता. हा कोरीव काम केलेला जो दगड दिसतोय, तो अॅक्चुअली माया जमातींच्या लोकांंचं कॅलेंडर आहे, जे त्यांनी बनवलं होता. ज्याला ‘Mesoamerican Long Count Calendar’ म्हणतात. निसर्गाला देव मानणारी माया सभ्यता, जी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, ती अचानक गायब कशी झाली? माया जमातीतील लोक नक्की कोण होते? हे जाणून घेऊ.(Top Stories)
मघाशी आपण ज्या माया जमातीच्या कॅलेंडरबद्दल बोललो, त्याबद्दल समजून घेऊ. मायांनी एक खास कॅलेंडर बनवलं होतं, जसं हिंदू धर्मात चार युगांचा उल्लेख होतो, तसंच मायांचा विश्वास होता, की ते चौथ्या जगात राहतात आणि तीन जग देवतांनी नष्ट केली. त्यांच्या गणनेनुसार, चौथ्या जगाची शेवटची तारीख होती १३ बाख होती. आता एक बाख म्हणजे १२६ वर्षांचा काळ आणि या कॅलेंडरचा शेवटचा दिवस आपल्या कॅलेंडरनुसार होता २१ डिसेंबर २०१२. यामुळेच सगळ्या जगभरात बातमी पसरली की, हा मायांचा कॅलेंडर संपतंय, म्हणजे जग नष्ट होणार! पण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, त्या दिवशी काहीच घडलं नाही. हा कॅलेंडरचा शेवट नव्हता, तर एका माया युगाचा अंत आणि त्यांच्या दुसऱ्या युगाची सुरुवात होती.(The Maya Mystery)
पण ज्या मायांनी इतक्या पुढच्या काळाचं कॅलेंडर बनवलं, जे गणित आणि खगोलशास्त्रात कमालीचे हुशार होते, ती सभ्यता आणि संस्कृती शेकडो वर्षांपूर्वीच का आणि कशी नाहीशी झाली? याचं उत्तर जाणून घेण्याआधी, चला माया जमातीबद्दल थोडं जाणून घेऊया.
माया सभ्यता हजारो वर्षांपूर्वी मध्य अमेरिकेत, म्हणजेच आजच्या मेक्सिको, ग्वाटेमाला, बेलीझ आणि होंडुरासच्या जंगलांमध्ये राहायची. तिकाल, चिचेन इत्झा, पालेन्के, कोपान, आणि मायापान ही मायांची प्रमुख शहरं होती. ही जमात शेती करायची, ज्यात ते मका, पिकं घ्यायचे, आणि शेतीसाठी स्लॅश अँड बर्न टेक्निकचा वापर करायचे. त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजेच देव होता. (Top Stories)
असं म्हणतात, ते ५००० पेक्षा जास्त देवी, देवतांची पूजा करायचे आणि मुख्य म्हणजे सूर्य, चंद्र, पाऊस आणि धान्य यांची पूजा करायचे. त्यांच्या धर्माचा मुख्य भाग होता, तो म्हणजे माणसाचा बळी. त्यांचा विश्वास होता की, प्रत्येक माणसात चुलेल नावाची जीवनशक्ती असते, आणि जर माणसाचा बळी दिला, तर त्यांच्यावर कोणतच संकट येत नाही आणि देवता प्रसन्न होतात. ईवन ही गोष्ट माहितीये का?मायांचा एक खास खेळही होता, ज्यात ते माकडच्या कवटीच्या आकाराचे चेंडू वापरायचे. आता खेळ कसा खेळला जायचा माहित नाही. पण असं म्हणतात, जी टीम हरेल त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा व्हायची.(The Maya Mystery)
जसं आपल्याकडे प्राचीन काळी क्षत्रिय राजे शासन करायचे, तसंच मायांमध्ये एलिट्स शासन करायचे. आणि राजाला कुहुल अजाव म्हणायचे. हा राजा कोणी सामान्य माणूस नव्हता, तर तो देवाचा अवतार किंवा दूत मानला जायचा. सगळे धार्मिक विधी राजाच करायचा. मायांमध्ये वेगवेगळ्या राजवंशांचं म्हणजे डायनॅस्टीजं युद्ध सतत चालायचं. २०१३ मध्ये ग्वाटेमालाच्या एका माया मंदिरात १५०० वर्षं जुनं दगडी स्मारक सापडलं. ज्यात सात वर्षं चाललेल्या एका प्राचीन रॉयल युद्धाची नोंद होती! पण १०व्या शतकात मायांची अनेक शहरं, विशेषतः तिकाल, पूर्णपणे ओस पडली आणि जंगलाचा हिस्सा बनली.
==================
हे देखील वाचा : Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!
==================
१९व्या शतकात स्थानिक जमातींनी ते पुन्हा शोधलं आणि आर्कियोलॉजिस्ट्सना त्याची माहिती मिळाली. आजही तिकालमध्ये भव्य पिरॅमिड्स आणि मंदिरं सापडतात. त्यांना आपल्यासारखं नॉलेज नव्हतं, तरी त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिड्सच्या तोडीची भव्य पिरॅमिड्स बांधली. याचं उदाहरणच बघायचं झालं तर, तिकाल टेंपल वन किंवा टेंपल ऑफ द जॅग्वार. आता चिचेन इत्झा बघा. बऱ्याच जणांना वाटतं की हे फक्त पिरॅमिड आहे, पण खरंतर चिचेन इत्झा हे मेक्सिकोच्या युकाटनमधलं एक प्राचीन माया शहर आहे. यातलं ‘टेंपल ऑफ कुंकुलकान’ खूप प्रसिद्ध आहे. त्याचं आर्किटेक्चर आणि भिंतींवरचं कोरीव काम आजही थक्क करणारं आहे! (The Maya Mystery)
पण ही माया सभ्यता आणि त्यांची संस्कृती अचानक कुठे गायब झाली? याचं उत्तर कोणाकडेच नाही. पण या बाबतीत इतिहासकारांनी काहो थेओरीस मांडल्या. एक थेओरी अशी की, मायांच्या राजवंशांमधली सततची युद्धं चालायची त्यामुळे त्यांचे रिसोर्सेस संपले असतील, यामुळे व्यापार आणि शेतीकडे लक्ष देणं अशक्य झालं आणि त्यांची अर्थव्यवस्था कोसळली. आणखी थेओरी सांगते की, मायांची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती. ९व्या आणि १०व्या शतकात बराच काळ दुष्काळ पडला, ज्यामुळे शेती ठप्प झाली आणि मायांना त्यांचा मूळ प्रदेश सोडावा लागला. (The Maya Mystery)
पण माया सभ्यता पूर्णपणे नष्ट झाली नाही. ‘नोजपेटेन’ नावाचं शेवटचं माया शहर १६९७ पर्यंत टिकून होतं. स्पॅनिश लोकांनी अमेरिकेत आक्रमण केलं, तेव्हा माया सभ्यता खऱ्या अर्थाने संपली. पण आजही मध्य अमेरिकेत सुमारे ६० लाख लोक स्वतःला मायांचे वंशज मानतात आणि त्यांचे काही परंपरा रीतिरिवाज अजूनही जपतात. तर ही होती माया सभ्यता आणि संस्कृतीची कहाणी! पण त्यांच्या गायब होण्याचं रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics