Travel Tips : प्रत्येकवेळी नव्या डेस्टिनेशनला भेट दिल्याने मन प्रसन्न आणि आनंदित होते. याशिवाय प्रवासाचा अनुभवही .येतो. काहीवेळेल प्रवास उत्तम होतो तर कधी अडथळे येतात. असे अडथळे प्रवासात येऊ नयेत म्हणून काय करावे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊया….
आपत्कालीन क्रमांक लिहून ठेवा
प्रवासावेळी तुमचा मोबाईल बिघडल्यास अथवा त्याचे चार्जिंग संपल्यास तुमच्याकडे आपत्कालीन क्रमांक तुमच्या डायरीमध्ये लिहिलेले असावेत. यामुळे कोणतीही स्थिती उद्भवल्यास तुम्ही आपल्या नातेवाईकांना फोन करून कळवू शकता.
आत्मविश्वास ढासळू देऊ नका
एखाद्या ठिकाणी रहायला गेल्यास तेथे आत्मविश्वासाने फिरा. तुमच्या बॉडी लँग्वेजवरुन फिरायला गेलेल्या ठिकाणी नवे आहात असे अजिबात दाखवून देऊ नका. यामुळे आसपासची लोक तुमच्यावर नजर ठेवून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात.
सेफ्टी किट ठेवा
सोलो ट्रॅव्हलिंगवेळी नेहमीच आपल्यासोबत पेपर स्प्रे, स्विस नाइफ आणि शिटी सोबत ठेवा. यामुळे तुमचा फिरतानाचा आत्मविश्वास अधिक वाढलेला राहिल. एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सेफ्टी किटचा वापर करू शकता.
चार्जर सोबत ठेवा
तुम्ही फिरण्यासाठी किती वेळासाठी जाता यानुसार फोन चार्ज करावाच. पण फोनचे चार्जरही बॅगेत असू द्या. कारण फोनचे चार्जिंग संपल्यानंतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चार्जर शक्य नसल्यास पॉवर बँक सोबत ठेवा. (Travel Tips)
स्किन केअर प्रोडक्ट्स
फिरायला जाताना बॅगेत नेहमीच स्किन केअर प्रोडक्ट्स असावेत. खरंतर, तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाता तेथे तुमच्या पसंतीचे स्किन केअर प्रोडक्ट्स मिळतील असे नाही. यामुळे प्रवासाआधीच स्किन केअर प्रोडक्ट्सची खरेदी करा.