केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणते. याच योजनांचा उद्देश असा की, लोकांना आर्थिक रुपात सक्षम करणे. सीनियर सिटीजन ते गरजू लोकांना पेंन्शन मिळावी म्हणून सरकारने काही योजना सुरु केल्या आहेत. या योजना बँकिंग, इंन्शुरन्स, रिटारमेंट प्लॅन आणि डिजिटल ट्रांजेक्शनसह विविध सुविधा देतात. तर सरकारच्या अशाच काही पर्सनल फायनान्ससंबंधित योजनांबद्दल अधिक जाणून घेऊयात.(Govt finance schemes)
-प्रधानमंत्री जन धन योजना
या योजनेला सरकारद्वारे देशातील प्रत्येक परिवारासाठी बँक खाते सुरु करण्याच्या उद्देशाने सुरु केली.या योजनेची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती. त्यानंतर करोडो लोकांना या योजनेअंर्गत बँकांमध्ये झिरो बॅलेन्स अकाउंट सुरु केले होते. या खात्याच्या माध्यमातून सरकार इंश्योरेन्स कवरेज, क्रेडिट फॅसिलिटी आणि शासकीय सब्सिडीच्या माध्यमातील पैसे लोकांना ट्रांन्सफर केले जातात.
-प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
ही योजना २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. यामधील ग्राहकांना कमीत कमी प्रीमियवर एक्सीडेंटल डेथ आणि विकलांगतेवर इंन्शुरन्स कवरेज दिले जाते. या योजनेअंतर्गत व्यक्तीचा आकस्मित मृत्यू आणि पूर्णपणे विकलांग लोकांना २ लाखांचे कवर दिले जते. आंशिक विकलांगतेसाठी १ लाखांचे कवर मिळते.
-अटल पेंन्शन योजना
सरकारची ही योजना पेंन्शन स्वरुपाची आहे. जी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे सुरु करण्यात आली होती. ही योजना जनतेला त्यांच्या वृद्धापकाळात एक स्थायी उत्पन्न मिळावे म्हणून सुरु करण्यात आली होती. यामधील व्यक्तीचे वय ६० वर्ष असावे.
-प्रधानमंत्री मुद्रा योजना
देशातील लहान आणि लघु उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास आर्थिक मदत मिळते. त्यामुळे त्यांचा व्यवसाय जर यशस्वी झाला तर त्यांना नंतर ईएमआयच्या रुपात ते पैसे परत करावे लागतात. सरकार असा दावा करते की, या योजनेअंतर्गत तरुणांना आपला व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल.(Govt finance schemes)
हेही वाचा- राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींकडून अनोखी भेट
-प्रधानमंत्री वय वंदन योजना
केंद्र सरकारच्या या प्रमुख कल्याणकारी योजनांपैकी एक असलेली ही योजना एक पेंन्शन योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक रुपात सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरु केली होती. या योजनेअंतर्गत रजिस्टर केल्या जाणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना एक निश्चित कालावधीपर्यंत नियमित पेंन्शन सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.