सहज आपल्या लक्षात येईल, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अभिनयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००४ मध्ये ते मुंबईला आले.
मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाचा, त्यांच्या चित्रपटातील प्रवासाचा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्यावर सखोल प्रभाव राहिला आहे. मनोज बाजपेयी प्रती असलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात त्यांनी मनोज बाजपेयी यांना गुरुस्थानी ठेवले आहे. मनोज यांच्याप्रती आपल्याला केवढा आदर होता हे सांगताना पंकज (Pankaj Tripathi) यांनी एक किस्सा सांगितला.

मनोज बाजपेयी तेव्हा पाटण्याला आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) त्याच हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर म्हणून कामाला होते. मनोज बाजपायी आपल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या रूममधून काहीही ऑर्डर आली तर ती मीच घेऊन जाणार असे त्यांनी सगळ्या स्टाफला सांगितले. पंकज त्रिपाठी त्यावेळी नाटकांत काम करायचे. ऑर्डरच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या रुममध्ये जाऊन त्यांची भेट देखील घेतली.
आपलं काम झाल्यानंतर मनोज बाजपेयी त्या हॉटेलमधून निघून गेले. जातांना मात्र आपल्या पायातील चप्पल ते तिथेच विसरून गेले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसह पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना देखील या गोष्टीची माहिती झाली. लॉस्ट अँड फाउंड विभागात ही चप्पल जमा न करण्याची विनंती त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना केली. ती चप्पल त्यांनी आपल्याकडेच ठेवून घेतली होती. गुरूची निशाणी म्हणून त्यांनी त्या चपलेचा सांभाळ केला.
=======
हे देखील वाचा : ‘या’ महिला आहेत भारतीय Alcohol ब्रँन्ड्सच्या मालक
======
मनोज बाजपेयी यांना पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गुरुतुल्य मानतात. त्यांच्यावर मनोज बाजपेयी यांचा किती मोठा प्रभाव आहे याबद्दल ते वारंवार बोलत असतात. पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयी हे आजूबाजूच्या जिल्ह्यातूनच येतात. त्यांची सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी जवळपास सारखीच आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये मनोज बाजपायी यांचे मोठे योगदान होते. मनोज बाजपेयी यांच्यासारखा सामान्य गावातील मुलगा जर अभिनय क्षेत्रात जाऊन एवढे नाव कमावत असेल तर आपणही जाऊ शकतो पंकज त्रिपाठी यांना हा विश्वास मनोज बाजपेयी यांच्यामुळेच मिळाला.
