Home » जवळपास सव्वाशे वर्ष जुनी असलेली पाकिस्तानातील बॉम्बे बेकरी!

जवळपास सव्वाशे वर्ष जुनी असलेली पाकिस्तानातील बॉम्बे बेकरी!

by Team Gajawaja
0 comment
Bombay Bakery
Share

भर उन्हाळ्यात देखील लागलेल्या लांबच लांब रांगा, एका लाल रंगाच्या इमारतीच्या आवारात झालेली गर्दी, उत्साहाने हातात केकचे बॉक्स घेऊन बाहेर पडणारे लोक. पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातील हैदराबाद मधील ‘द बॉम्बे बेकरी’च्या (Bombay Bakery) आवारातील हे दृश्य आहेत.

१९११ साली फलाज राय गंगाराम थडानी यांनी एका बंगल्यात या बेकरीची (Bombay Bakery) सुरुवात केली. या बेकरीमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. फलाज राय त्यांच्या तीन मुलांसह, श्यामदास, किशनचंद आणि गोपीचंद यांच्यासोबत इथे राहायचे. फलाज यांच्यानंतर त्यांच्या मुलगा किशनचंद यांनी या बेकरीची धुरा सांभाळली. १९६० मध्ये किशनचंद यांचे निधन झाल्यानंतर पुढे त्यांचा मुलगा कुमार आणि त्यांच्या भावाने हा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. २०१० साली कुमार यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा दत्तक मुलगा सलमान शेख हे बेकरीचा कारभार सांभाळायला लागले.

या बेकरीमध्ये (Bombay Bakery) बनणारे केक हे दशकानूदशके लोकांच्या पसंतीचे राहिलेले आहेत. सिंध प्रांतातील बरेच वयस्कर लोक असे आहेत. ज्यांनी लहान असताना पहिला केक याच बेकरीचा खाल्ला होता आणि अजूनही ते याच बेकरीचा केक खाणे पसंद करतात. मागच्या सव्वाशे वर्षांपासून बॉम्बे बेकरीमध्ये (Bombay Bakery) केक बनवले जातात तेही कुठल्याही मशीनचा वापर न करता. केक बनवण्याच काम येथील कर्मचारी हातानेच करतात.

इथे दिवसातून फक्त तीन वेळाच केक विकले जातात. सकाळी आठ वाजता बेकरी उघडते पण त्या अगोदरच लोकांनी इथे रांगा लावयला सुरुवात केलेली असते. बेकरी उघडली की, लगेच केक संपून जातात. त्यानंतर दुपारी तीन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता परत हिच प्रक्रिया होते. सुरुवातीला एका वेळी एकाच फ्लेवरचा केक विकला जायचा परंतु ग्राहकांच्या तक्रारीनंतर एका वेळी अनेक फ्लेवरचे केक विकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. एका व्यक्तीला एका वेळी मात्र जास्तीत जास्त दोन केक विकत घेता येतात.

याबद्दल सांगताना बेकरीचे (Bombay Bakery) व्यवस्थापक म्हणतात, या बेकारीचे केक एवढे प्रसिद्ध आहेत की, बऱ्याचदा लोक इथून जास्तीचे केक घेऊन बाहेर ज्यादा किमतीने विकतात असा प्रकार टाळण्यासाठी बेकरीच्या व्यवस्थापकांनी एका वेळी जास्तीत जास्त दोनच केक एका व्यक्तीला द्यायचा निर्णय घेतला.

========

हे देखील वाचा : 10 हजारांच्या गुंतवूणकीतुन कंपनीची हजारो कोटींची उलाढाल!

========

कित्येक दशकांपासून नियमित ग्राहक असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या कित्येक दशकांपासून येथील केकचा दर्जा आणि चव हे कधीही ढासळले नाहीत. बाहेर यापेक्षा जास्त पैसे मोजुन देखील अशी चव मिळत नाही. त्यामुळे कुठलाही सणसमारंभ असो अथवा वाढदिवस असो केक हमखास बॉम्बे बेकरीचाच (Bombay Bakery) असतो. कित्येक पिढ्यांचे आयुष्य ही बेकरी गोड करत आलीये आणि अजूनही करतेय.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.