अनेकांना रोज गरम पाणी पिण्याची सवय असते. अर्थात याची विविध कारण असू शकतात. काहींना वाटत की, दिवसभर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते तर काहींना वाटत गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्हालाही दिवसभर खुप गरम पाणी पिण्याची सवय आहे का? तर मग हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण तो तुमच्यासाठी खास असणार आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीराला खुप फायदे होतात हे तुम्ही ऐकल असेल पण गरम पाण्याच्या अतिसेवन तुमच्या शरीराला घातक ठरू शकते. कोणत्याही गोष्टीचे अति सेवन शरीराला चांगले नसते त्याप्रमाणेच गरम पाण्याचे ही काही दुष्परिणाम आहेत जे आपण आपण जाणून घेणार आहोत. (Hot Water Side Effect)
सतत गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम
– सतत गरम पाणी प्यायल्याने तुमच्या घशाला आणि जिभेला त्याचा त्रास हो शकतो ज्यामुळे घसा आणि जीभेची जळजळ होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला अन्न खाताना सुद्धा त्रास होऊ शकतो.
– तहान लागलेली नसताना सुद्धा सतत गरम पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचा समतोल बिघडू शकतो तसेच एकाच वेळी खुप पाणी प्यायल्याने मेंदूच्या पेशींना सूज येऊ शकते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
– सतत गरम पाणी प्यायल्याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडण्यास मदत होते. जसे झोपेच्या वेळेमध्ये किंवा शांत झोप लागण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात ज्याचा सरळ परिणाम तुमच्या इतर शारीरिक गोष्टींवर पण होऊ लागतो.
– जास्त गरम पाणी प्याल्याने अल्सर सारखा त्रास उद्भवू शकतो जे अधिक वाढल्यास अन्ननलिकेला सूज येण्याची किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे व्यक्तीला अन्न ग्रहण करता येणे अवघड होते.

– सतत गरम पाण्याचे सेवन केल्याने रात्री अनेकदा शौचालयास जाण्याचा त्रास होऊ शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या शरीराबरोबर तुमच्या झोपेवर सुद्धा होतो.
– अस म्हणतात की, खुप पाणी प्यायल्याने पोटातील घाण बाहेर निघून जाण्यास मदत होते पण लक्षात घ्या गरम पाण्याचे अतिसेवन मूत्रपिंडावर अधिक भार निर्माण करतो, ज्यामुळे किडनी खराब होण्याच्या धोक्यात वाढ होते.
========
हे ही वाचा: तुमच्या शरिरातील प्रोटीनची कमतरता जाणवत असल्याची ‘ही’ आहेत लक्षणं
========
– जास्त गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्तावर आणि शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो. जास्त गरम पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील इलेक्ट्रोलाइट्स पातळ होतात ज्याचा समतोल राखण्यासाठी रक्तातून पेशींमध्ये पाणी वाहून जाईल. जर हे असच नेहमी आणि जास्त काळासाठी सुरु राहिले तर यामुळे मेंदूच्या पेशींना सूज येऊ शकते, ज्यामुळे क्रॅनियल दबाव येईल आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

तर आजच्या लेखात आपण गरम पाण्याच्या अति सेवनाचे दुष्परिणाम जाणून घेतले आणि आम्ही आशा करतो की, यापुढे तुम्ही गरम पाण्याचे सेवन करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवाल. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीचे पदार्थाचे अति सेवन हे नेहमी घातकच असते
(Disclaimer: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. कोणत्याही गोष्टीचे अनुकरण करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)