Home » ‘या’ राशींना होणार व्यवसाय उद्योगातून लाभ

‘या’ राशींना होणार व्यवसाय उद्योगातून लाभ

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

आजच्या आठवड्याचे राशीभविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा हा आठवडा. जाणून घ्या कोणत्या राशीला होणार व्यवसाय उद्योगातून लाभ (Weekly Horoscope 30 Jan to 05 Feb)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातील राशीस्वामी मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर धनेश शुक्र आणि दशमेश शनि यांचे लाभस्थानातून भ्रमण होत असल्यामुळे आपली आवक वाढणार आहे. व्यवसाय उद्योगातून चांगले अर्थार्जन होईल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. भावंडांची सुसंवाद साधाल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. कुटुंबीयातील सदस्यांबाबत सुवार्ता कानी येतील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आठवड्याचा उत्तरार्धात अतिशय आनंदात आणि मजेत जाईल.

शुभ दिनांक – 4, 5

वृषभ – राशीतील मंगळावरून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या वाणीच्या जोरावर लोकांना आपलेसे करून घ्याल. व्यवसाय उद्योगातून लाभ होतील. विदेशात आपला व्यवसाय वाढवण्यात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील‌. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. भावंडाचेे सहकार्य लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. महत्त्वाची कामे मोठ्या जबाबदारीने मार्गी लावण्यात यश येईल.

शुभ दिनांक – 30, 31.

मिथुन – आपल्या राशीच्या वेळेस स्थानातील मंगळावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणतेही निर्णय घेताना अति घाई करू नका, योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळेच आपला फायदा होणार आहे. राशीस्वामी बुध सप्तमस्थानात असल्याने भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. नवीन कार्यारंभ केले जातील. वैयक्तिक उत्कर्षाच्या वार्ता कानी येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 1 ते 3

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या लाभस्थानातील दशमेश मंगळावरून राशी स्वामी चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात महत्त्वाची कामे मार्गी लावता येतील. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. राशीच्या अष्टमस्थानातून शनी, शुक्राचे भ्रमण होत आहे, तेव्हा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून आपले नुकसान करून घेऊ नका. स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराची कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

शुभ दिनांक – 4, 5

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. व्यवसाय उद्योगातून कामाचा व्याप वाढेल. नवीन कार्यारंभ केले जातील. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. सरकारी कामातून यश मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामातून आपल्या बाजूने निकाल लागतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.

शुभ दिनांक – 1 ते 3

कन्या – राशीच्या भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्ष करणारे राहील. आळस झटकून नव्या जोमाने कामाला लागल. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगले आवक होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. तरुणांना नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. सतत कार्यरत राहिल्यामुळे आपले ध्येय गाठणे सोपे होईल. उत्तरार्धात मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल.

शुभ दिनांक – 3 ते 5

तूळ – अष्टमस्थ मंगळावरून होणारे चंद्राचे भ्रमण काहीसा मनस्ताप देणारे राहू शकते. मोठे निर्णय घेणे तुर्तास टाळावे. कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. समाजातील स्वतःची पथप्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने सततत प्रयत्नशील राहाल. गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. पूर्वी मिळालेल्या ऑर्डर्स मध्ये वाढ होईल. विरोधकांवर विजय मिळवाल. प्रतिस्पर्धी आपल्या मताशी सहमत होतील. आपल्या कामातील अडचणी दूर होतील.

शुभ दिनांक – 1, 2

वृश्चिक – सप्तमस्थानात राशीस्वामी मंगळाची व भाग्येश चंद्राची युती होत आहे. स्वकर्तृत्वावर महत्त्वाचे निर्णय घेऊन यशस्वीपणे पार पाडले जातील. व्यवसाय उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात यश लाभेल. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. कुटुंबातील एखादे काम पुढाकार घेऊन केले जाईल. या आठवड्यात आपणास असलेली अनुकूल गृह स्थिती मानसिक स्वास्थ देणारी राहील.

शुभ दिनांक – 30, 31

धनु – राशीच्या षष्ठस्थानातून होणारी चंद्र मंगळाची युती आपणास अनुकूल फलदायी राहील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. स्वतंत्र विचारसरणी व आपली जिद्द आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. एखाद्या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. पूर्वी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. उत्तरार्धात भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.

शुभ दिनांक – 1 ते 3

मकर – राशीतील रवी व पंचम स्थानातील मंगळ व चंद्र आपल्या वैयक्तिक उत्कर्षासाठी पूरक ठरतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. एखाद्या संघटनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकाराल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. आपणास नवीन व्यासपीठ उपलब्ध होईल. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. गरजेपेक्षा हौसेसाठी पैसा खर्च केला जाईल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 30, 31

कुंभ – राशीतून शनी, शुक्राचे तर सुखस्थानातून चंद्र, मंगळाचे भ्रमण होत आहे. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना समाजात चांगला नावलौकिक मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रमात मोलाचा सहभाग घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. कलाक्षेत्रातून व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील सुख सुविधा वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. संततीसाठी वेळ देता येईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात अथवा सहलीत सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. उत्तरार्धात प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 1 ते 3

मीन – राशीतून गुरु आणि पराक्रम स्थानातून मंगळ, चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या आत्मविश्वास व महत्त्वाकांक्षा वाढवणारे राहील. गृह उद्योगातून व जोडधंद्यातून कामाचा व्याप वाढवण्यात यश लाभेल. कितीही कठीण प्रश्न समोर असले तरी त्यातून योग्य मार्ग काढले जातील. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी अनेक लोकांशी केलेली चर्चा यशस्वी होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. घरात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. पाहुण्यांची वर्दळ राहील. घरातील वातावरण अतिशय आनंदी उत्साही राहिल्यामुळे मन प्रसन्न राहील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल.

शुभ दिनांक – 4, 5.

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.