एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत कमी वेळात पोहचायचे असेल तर विमानातून प्रवास केला जातो. विमानातून तासाभरात ही शेकडो किमीचे अंतर पार केले जाते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, त्यांच्या रंग नेहमीच सफेद का असतो? यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात. खरंतर विमानाचा रंग सफेद ठेवल्याने कंपनीच्या लाखो रुपयांची बचत होते आणि अन्य दुसरे फायदे ही होतात. (Flight color code)
विमानाचा रंग सफेद का असतो?
विमानाचा रंग सफेद असण्यामागे वैज्ञानिक कारण दिले जाते. ते म्हणजे सफेद रंगामुळे उष्णता कमी शोषली जाते. तज्ञ असे सांगतात की, जेव्हा विमान आकाशात हजारो फूट उंचीवरुन उडते तेव्हा तेथे ऊन खुप असते. जर विमान सफेद रंगाऐवजी अन्य रंगाचे असेल तर ते लगेच गरम होऊ शकते. तर सफेद रंग उष्मा शोषून घेतो. त्यामुळेच अन्य रंगांच्या तुलनेत सफेद रंगाची विमानं असतात आणि ते कमी गरम होतात.
कमी खर्च येतो
तज्ञ असे सांगतात की, एक विमान रंगवण्यासाठी ५० हजार ते २ लाख डॉलरचा खर्च येतो. जर विमानाला एखादा दुसरा रंग दिल्यास तर त्यावर पडलेले स्क्रॅच ही लवकर दिसतात. मात्र सफेद रंगावरील स्क्रॅच लगेच दिसून येत नाहीत. विमान बनवण्याव्यतिरिक्त कंपनी रंगाचा खर्च करण्यावर अधिक जोर देत नाही. यामुळे ही विमान सफेद रंगाचे ठेवले जाते.
अधिक उंचीवरुन का उडतात विमानं?
विमान अधिक उंचीवरुन उडण्याचे कारण असे की, उंच इमारतीला टक्कर लागू नये.या व्यतिरिक्त अधिक उंचीवर पक्षी सुद्धा नसतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता फार कमी असते. सर्वसामान्यपणे एक विमान ३५ हजार फूट उंचीवरुन उडते. येथे हवेचा दाब कमी असल्याने विमान उड्डाणासाठी सुद्धा कमी जोर लावावा लागतो. अधिक उंचीवरुन उड्डाण केल्याने त्यामधील इंधनाची सुद्धा बचत होते. (Flight color code)
या व्यतिरिक्त आपण पाहतो की, विमानात बहुतांशकरुन त्याच्या सीट्स या निळ्या रंगाच्या असतात. तर काही रिपोर्ट्सनुसार, निळ्या रंगाच्या सीट्सचा वापर काही दशकांपासून झाला होता. आज ही त्या निळ्या रंगाच्या असतात. वैज्ञानिकांच्या द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, निळा रंग हा विश्वास आणि सुरक्षितता दर्शवतो. ऐवढेच नव्हे तर निळा रंग अशा लोकांसाठी सुद्धा खुप फायदेशीर ठरतो ज्यांना एअर फोबिया असतो.
हे देखील वाचा- लँन्ड होताच झाले असते प्रमोशन, १६ वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू; अशी आहे अंजूची कथा
यापूर्वी १९७० आणि १९८० मध्ये काही विमान कंपन्यांनी आपल्या सीट्ससाठी लाल रंगाचे फॅब्रिक वापरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी नंतर त्या निळ्या रंगाच्या केल्या. यामागील कारण असे होते की, लाल रंगाच्या सीट्स हा प्रवाशांमध्ये अधिक आक्रमकतेचा स्वभाव निर्माण व्हायचा. त्यामुळे त्या लाल ऐवजी निळ्या रंगाच्या केल्या गेल्या.