Home » अशक्यच! ३० वर्षांपूर्वी भ्रुण गोठवले होते, आता जन्मली जुळी मुलं

अशक्यच! ३० वर्षांपूर्वी भ्रुण गोठवले होते, आता जन्मली जुळी मुलं

by Team Gajawaja
0 comment
Embroys Frozen 30 Years
Share

आपल्याला मुलं होणं ही खुप आनंददायी गोष्ट आहे. त्या मुलाला ९ महिने पोटात सांभाळल्यानंतर ते जन्म घेते तेव्हा त्याला नव्या जगाची ओळख करुन देण्यासाठी आपण फार उत्सुक असतो. तसेच सध्या मुलं होण्यासाठी सुद्धा काही वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात. अशातच तुम्ही कधी एखाद्या महिलेचे भ्रुण गोठवल्याचे ऐकले आहे का? हे तर अशक्यच आहे पण मात्र भ्रुण गोठवल्यानंतर ही बाळ जन्माला येते हे तर अधिकच विश्वास ठेवण्यासारखे नाही. अशातच आजपासून ते जवळजवळ ३० वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेनेसी राज्यातील भ्रुण फ्रोजन म्हणजेच भ्रुण गोठवण्यात आले होते. आता त्या भ्रुणापासून जुळी मुलं जन्माला आली आहेत. ऐवढ्या दीर्घकाळापासून एकाखे भ्रूण जमा करणे आणि त्यानंतर त्यापासून यशस्वीपणे नवजात बाळांचा जन्म होणे हा एक नवा रेकॉर्ड आहे. भ्रुण हे २२ एप्रिल १९९२ रोजी जवळजवळ १२८ डिग्री सेंटीडिग्री म्हणजेच २०० फॅरनहाइटवर लिक्विड नाइट्रोजन मध्ये ठेवण्यात आले होते.(Embroys Frozen 30 Years)

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, चार मुलांची आई रेशेल रिजवे यांनी ३१ ऑक्टोंबरला जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांचे वडिल फिलिप रिजवे या बातमीमुळे अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनी याला चमत्कारच असल्याचे म्हटले. राष्ट्रीय भ्रूण दान (एनईडीसी) नुसार लिडिया एन आणि टिमोथी रोनाल्ड रिजवे यांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे. खरंतर एनईडीसी एक खासगी आस्था आधारित संघटना आहे. यापूर्वी २०२० मध्ये अशाच पद्धतीने जमा करण्यात आलेल्या भ्रुणापासून २७ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला होता.

Embroys Frozen 30 Years
Embroys Frozen 30 Years

राष्ट्रीय भ्रुण दान केंद्र एक खासगी आस्था आधारित संघटना असून त्यांच्या मते, लिडिया एन आणि टिमोथी रोनाल्ड रिजवे यांनी एक नवा रेकॉर्ड कायम केला आहे. यापूर्वी २०२० मध्ये जमा करण्यात आलेल्या भ्रुणापासून २७ वर्षानंतर मुलाला जन्म दिला होता. त्यासाठी एका अज्ञात विवाहित जोडप्यासाठी आयवीएफचा वापर करुन हे जुळे भ्रुण तयार करण्यात आले होते. विवाहित जोडप्यातील पुरुषाचे वय जवळजवळ ५० वर्ष होते. त्यांनी याला अमेरिकेतील पश्चिम तटाच्या एका फर्टिलिटी लॅबमध्ये २००७ पर्यंत ठेवले होते. त्यानंतर जोडप्याने त्याला नोक्सविले मध्ये एनईडीसीला दान केले कारण दुसऱ्या जोडप्याला त्याचा वापर करता येईल.(Embroys Frozen 30 Years)

हे देखील वाचा- रात्रभर तुमचे मुलं झोपत नाही? ‘हे’ उपाय वापरुन पहा

या यशानंतर एनईडीसीला अपेक्षा आहे की, दुसरे लोक सुद्धा भ्रुण दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. एका विधानात एनईडीसीने असे म्हटले की, अशी अपेक्षा आहे ही बातमी दुसऱ्या भ्रुणाला दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.