“एक महिला काय करु शकते” किंवा “एक महिला काय करु शकत नाही” यामधील जे अंतर आहे ते ठरवणे एका महिलेसाठी फार कठीण असते. याचेच उदाहरण म्हणजे मेहरुनिस्सा शौकत अली. हिने आपल्या आयुष्यात अशा निर्णयांचा नेहमीच आदर केला ज्यामुळे ती आता जगभरातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. सहारनपुर सारख्या लहानश्या गावात मुस्लिम परिवारात तिचा जन्म झाला. घरातील वातावरण म्हणजे एक महिला फक्त घरातील काम, लग्न, मुलांना जन्म देणे आणि घरातील मंडळींची देखभाल करणे याच्या चौकटीतील होते. परंतु या चौकटीच्या बाहेर पडत आज मेहरुनिस्सा ही देशातील पहिली महिला बाउंसरच्या रुपात ओळखली जाते. तर जाणून घेऊयात तिच्याबद्दल अधिक.(First Female Bouncer of India)
वयाच्या १२ व्या वर्षी झाले लग्न
मेहरुस्सा ही एका गुर्जर मुस्लिम परिवारात जन्मलेली. घरातील मंडळी नेहमीच मुलगी-मुलगा यांच्यामध्ये तुलना करणारा. पण शिक्षणासाठी विरोध हा दोघांसाठी समान होता. मुलांना सुरुवातीपासूनच बाहेरची काम करण्यासाठी सांगितले जायचे. तर घरातील कामे ही मुलीने करायची. शिक्षणासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. वडिलांनी स्वत: प्रेमविवाह केला होता आणि आई ही एका हिंदू परिवारातील होती. लग्नापूर्वी आई सुद्धा शिकत होती आणि तिच्याचमुळे आम्हाला सुद्धा शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जात होता. पण त्यामध्ये सुद्धा खुप समस्या होत्या. आम्ही चार बहिणी आणि तीन भावंड. यामध्ये मेहरुस्सा ही तिसरी मुलगी. शाळेच्या सुरुवातीनंतर तिची मोठी आणि लहान बहिण हिचे लग्न लावून देण्यात आले.
तर वयाच्या १० व्या वर्षी लहान बहिणीचे लग्न लावून दिल्यानंतर १४ व्या वर्षी ती एका मुलाची आई झाली. त्यानंतर मेहरुनिस्सा हिचे सुद्धा वयाच्या १२ व्या वर्षी लग्न लावून देण्यात आले. पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा आजारी पडल्याने ते झाले नाही.
आईच्या हट्टामुळे पुन्हा सुरु झाले शिक्षण
आजारपणानंतर पुन्हा ठिक झाल्यानंतर आईच्या हट्टामुळे पुन्हा शिक्षण सुरु झाले. त्या दरम्यान वडिलांना त्यांच्या कामात खुप नुकसान झाले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत मला घरातील मंडळींची मदत करायची होती. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण स्थिती अशी झाली होती की, मला वाटले नोकरी करणे गरजेचे आहे. तेव्हा दिल्लीतील एका नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली. (First Female Bouncer of India)
ज्यावेळी मेहरुस्साने पहिल्यांदा नागलोईत बाउंसरला पाहिले तेव्हा तेथे नोकरी संदर्भात विचारले. अशातच एका कार्यक्रमासाठी तिला बाउंसर म्हणून संधी ही मिळाली. पण महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात होता. तेव्हा काही गोष्टींचा विरोध करण्यास सुरुवात केली. यामुळे असे झाले की मेहरुस्साला महिला बाउंसरची कमान सांभाळण्यास फार मदत झाली. इंडियन आयडॉलच्या टीममध्ये महिला बाउंसरच्या रुपात सुद्धा तिने काम केले. या व्यतिरिक्त सोनू निगम यांच्या कॉन्सर्ट्सह बड्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा बाउंसरचे काम करण्याची संधी तिला मिळाली.
हे देखील वाचा- नशीब पालटण्यास भाग पाडणाऱ्या तुरुंग अधिकारी मिरा बाबर यांची प्रेरणादायी कथा
२०२१ मध्ये सुरु केली स्वत:ची कंपनी
त्यानंतर २०२१ मध्ये मी स्वत:ची सिक्युरिटी कंपनी मेहरुनिस्साने सुरु केली. मर्दानी बाउंसर असे त्या कंपनीचे नाव ठेवण्यात आले. या कंपनीत १५०० तरुणी काम करतात. तिचा असा उद्देष आहे की, महिलांना सुद्धा या क्षेत्रात पूर्णपणे सन्मान दिला गेला पाहिजे. त्यांना फक्त सिक्युरिटी गार्ड म्हणून ओळखू नये. बाउंसर आणि सिक्युरिटी गार्ड मधील कामाचे अंतर हे फार वेगळे असते.