WhatsApp Deleted Messages : काहीजणांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून डिलिट करण्याची सवय असते. अशातच मेसेज काय होता असे विचारले असता काहीनाही असे उत्तर समोरच्या व्यक्तीकडून दिले जाते. पण तरीही विचार केला जातो, नक्की मेसेज काय केला असावा? डिलिट केलेला मेसेज वाचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. पण सोप्या ट्रिकने डिलिट केलेला मेसेज वाचता येणार आहे.
असा वाचा डिलिट केलेला मेसेज
व्हॉट्सअॅपवर डिलिट केलेला मेसेज वाचण्यासाठी सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे नोटिफिकेशनचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर More किंवा Advance Setting वर क्लिक करा. हे प्रत्येक डिवाइसमध्ये वेगवेगळ्या नावाने असू शकते. येथे नोटिफिकेशन हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा. आता तुम्हाला डिलिट केलेले मेसेज दिसतील. लक्षात ठेवा, डिलिट मेसेज वाचण्यासाठी फोनमध्ये व्हॉट्सअॅप नोटिफिकेशनचा ऑप्शन इनेबल असणे अत्यावश्यक आहे.
नोटिफिकेशन बार
डिलिट केलेला मेसेज अशा कारणास्तव दिसतो कारण तुम्ही व्हॉट्सअॅप मेसेजचे नोटिफिकेशन ऑन ठेवले आहे. जेव्हा नोटिफिकेशन हिस्ट्री पाहता तेव्हा डिलिट केलेले मेसेज देखील दाखवले जातात. (WhatsApp Deleted Messages)
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर
व्हॉट्सअॅपकडून नेहमीच युजर्ससाठी नवे अपेडट्स आणले जातात. युजर्सच्या सुविधेसाठी व्हॉट्सअॅप आता एक नवे फीचर लवकरच आणणार आहे. यामध्ये युजर्सच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेतली जाणार आहे. हे फीचर तुम्हााल Block Unknown Account Message च्या नावाने मिळणार आहे. अॅपच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर Advanced च्या ऑप्शनमध्ये मिळणार आहे. हे फीचर सुरु केल्यानंतर तुम्ही अज्ञात क्रमांकावरुन येणारे व्हॉट्सअॅप मेसेज बंद करू शकता. सध्या हे फिचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. लवकरच युजर्ससाठी रोलआउट केले जाण्याची शक्यता आहे.